सामाजिक जाणीव दिवसागणिक कमी होतेय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 03:46 IST2016-02-19T10:46:06+5:302016-02-19T03:46:06+5:30
समाजात पसरलेला भेदभाव आणि असमानता यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचे हनन होऊ नये म्हणूनच संयुक्त राष्ट्राने २० फेब्रुवारी हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आणि तेव्हापासून तो या दिवशी साजरा होतही आहे. परंतु मागच्या काही दिवसात देशातील सामाजिक न्यायाची स्थिती बिघडते की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. दादरी हत्याकांड, रोहित वेमुलाची आत्महत्या, जेएनयू प्रकरण या घटनांकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे. विविध संस्कृती व परंपरा असतानाही एकोप्याने नांदणाºया भारतात अशा घटना घडताना बघून तरुणाई स्तब्ध झाली आहे. सीएनएक्सने या विषयावर या तरुणाईला बोलते केले असता ती अगदी भरभरून व्यक्त झाली. सामाजिक न्याय मिळविण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागत आहे. हे इतक्या तिव्रतेने पहिल्यांदा घडत आहे. आधी इतकी चिंता करणारी स्थिती नव्हती. आधी समाजातील कमकुवत गटांना मदत करणाºया कामाला तात्त्विक अधिष्ठान देणारे आणि व्यक्तिगत जगण्यात समाजाचा विचार का हवा याविषयी सांगणारे अनेक लोकं भेटायचे. आज मात्र कोणीच यावर बोलताना दिसत नाही. मी माझे घर, माझी जात, या पलीकडे जावून जोपर्यंत विचार केला जाणार नाही तोपर्यंत हे चित्र बदलणार तरी कसे, असा प्रश्न या तरुणाईने उपस्थित केला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा आपला समाज प्रभावी होण्यास त्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळणे आवश्यक आहे. हे अंमलात येण्यासाठी आवश्यक असलेले बारकावे हे समाजाला लक्षात आणून देण्यासाठी आज थोर विचारवंतांची गरज भासत आहे. मात्र आजच्या फास्ट लाईफ स्टाईलमुळे आपल्याला त्यांच्या विचारांची गरज असतानाही त्याकडे आपले लक्ष जात नाही. आज जे काही देशात घडत आहे हे बघून त्या थोर विचारवंतांची उणीव भासत आहे. - संवेदनशील मनच उरलेले दिसत नाही सारेच विचित्र घडत आहे. ज्या विषयामुळे आपला देश प्रगतीपथाकडे जाईल त्या विषयाकडे लक्ष द्यायला कुणाकडेही वेळ नाही. सामाजिक बांधिलकीची तर कुणी गोष्टही करताना दिसत नाही. समाजील दुर्बल घटकांप्रती असलेली संवेदनशीलताही कमी होत चालली आहे. काही राजकारणी आपले हित जोपासण्यासाठी समाजातील न्याय व्यावस्थेला खिंडार पाडत आहे. हे दुर्देवी आहे. - मानवतावाद हा एकच धर्म व्हावा मानव ही एकच जात आहे. या सबंध मानवजातीसाठी मानवतावाद हा एकच एक धर्म आहे व त्यामुळे त्याला मानवधर्म असे म्हटले गेले पाहिजे. मानवजातीला या धर्मात स्पष्ट अशी ध्येये मात्र आहेत. ती म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय. आजच्या युगात दया, माया अथवा त्यातूनच येणारा सामाजिक न्याय मिळणे फार कठीण होऊन बसले आहे.- अंजली टेकचंदानी सामाजिक बांधिलकी फक्त फोटोपुरती नको समाजाच्या विकासाच्या दृष्टीने एक विचारधारा हवी आहे. धर्म हा फार खासगी विषय आहे. त्याचा फटका इतरांना बसू नये. सामाजिक बांधिलकीची भावना फक्त फोटो काढण्यापुरती असू नये. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. म्हणूनच सामाजिक न्यायाची अपेक्षा असणाºया अनेकांना तो मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. लोकशाही मूल्ये स्वीकारलेल्या राष्ट्रात असे काही घडणे निश्चितच योग्य नाही. - अभिषेक शर्मा जेएनयूत काय सुरू आहे बघ जरा! देशातील सामाजिक शांततेचे वातावरण बिघडतेय हे तर आपल्याला मान्य करावेच लागेल. जेएनयूमध्ये काही विद्यार्थ्यांवर सुडबुध्दीने कारवाई केली जात आहे. त्यावर काही तोडगा अद्याप निघालेला नाही. न्यायासाठी आटापीटा करणाºयांना न्याय मिळत नाही. विनाकारण प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न होतोय. समाजातील भेदभाव कमी व्हायची चिन्हे नाहीत. काय हाच तो भारत आहे जेथे समाजात शांतता नांदावी यासाठी अनेकांनी आपले प्राण गमावले? - अविनाश देऊळकर पटीयाला कोर्टातील उदाहरण ताजे न्याय व्यवस्था सांभाळणारी मंडळीच कायदा हातात घ्यायला लागली तर कसे होईल. एखाद्या गोष्टीला विरोध असेल तर तो विरोध दर्शविण्याची एक पद्धत असते. त्यासाठी हिंसक होण्याची गरज नाही. असे हिंसक होताना अनेकदा मूळ विषय बाजूला पडून व्यक्तीगत द्वेष आपल्यावर हावी होत असतो. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने असे घडणे योग्य नाही. ? - निहाल गुप्ता

सामाजिक जाणीव दिवसागणिक कमी होतेय!
सामाजिक न्याय मिळविण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागत आहे. हे इतक्या तिव्रतेने पहिल्यांदा घडत आहे. आधी इतकी चिंता करणारी स्थिती नव्हती. आधी समाजातील कमकुवत गटांना मदत करणाºया कामाला तात्त्विक अधिष्ठान देणारे आणि व्यक्तिगत जगण्यात समाजाचा विचार का हवा याविषयी सांगणारे अनेक लोकं भेटायचे. आज मात्र कोणीच यावर बोलताना दिसत नाही. मी माझे घर, माझी जात, या पलीकडे जावून जोपर्यंत विचार केला जाणार नाही तोपर्यंत हे चित्र बदलणार तरी कसे, असा प्रश्न या तरुणाईने उपस्थित केला.
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा
आपला समाज प्रभावी होण्यास त्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळणे आवश्यक आहे. हे अंमलात येण्यासाठी आवश्यक असलेले बारकावे हे समाजाला लक्षात आणून देण्यासाठी आज थोर विचारवंतांची गरज भासत आहे. मात्र आजच्या फास्ट लाईफ स्टाईलमुळे आपल्याला त्यांच्या विचारांची गरज असतानाही त्याकडे आपले लक्ष जात नाही. आज जे काही देशात घडत आहे हे बघून त्या थोर विचारवंतांची उणीव भासत आहे. -
संवेदनशील मनच उरलेले दिसत नाही
सारेच विचित्र घडत आहे. ज्या विषयामुळे आपला देश प्रगतीपथाकडे जाईल त्या विषयाकडे लक्ष द्यायला कुणाकडेही वेळ नाही. सामाजिक बांधिलकीची तर कुणी गोष्टही करताना दिसत नाही. समाजील दुर्बल घटकांप्रती असलेली संवेदनशीलताही कमी होत चालली आहे. काही राजकारणी आपले हित जोपासण्यासाठी समाजातील न्याय व्यावस्थेला खिंडार पाडत आहे. हे दुर्देवी आहे. -
मानवतावाद हा एकच धर्म व्हावा मानव ही एकच जात आहे. या सबंध मानवजातीसाठी मानवतावाद हा एकच एक धर्म आहे व त्यामुळे त्याला मानवधर्म असे म्हटले गेले पाहिजे. मानवजातीला या धर्मात स्पष्ट अशी ध्येये मात्र आहेत. ती म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय. आजच्या युगात दया, माया अथवा त्यातूनच येणारा सामाजिक न्याय मिळणे फार कठीण होऊन बसले आहे.- अंजली टेकचंदानी
सामाजिक बांधिलकी फक्त फोटोपुरती नको
समाजाच्या विकासाच्या दृष्टीने एक विचारधारा हवी आहे. धर्म हा फार खासगी विषय आहे. त्याचा फटका इतरांना बसू नये. सामाजिक बांधिलकीची भावना फक्त फोटो काढण्यापुरती असू नये. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. म्हणूनच सामाजिक न्यायाची अपेक्षा असणाºया अनेकांना तो मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. लोकशाही मूल्ये स्वीकारलेल्या राष्ट्रात असे काही घडणे निश्चितच योग्य नाही. - अभिषेक शर्मा
जेएनयूत काय सुरू आहे बघ जरा!
देशातील सामाजिक शांततेचे वातावरण बिघडतेय हे तर आपल्याला मान्य करावेच लागेल. जेएनयूमध्ये काही विद्यार्थ्यांवर सुडबुध्दीने कारवाई केली जात आहे. त्यावर काही तोडगा अद्याप निघालेला नाही. न्यायासाठी आटापीटा करणाºयांना न्याय मिळत नाही. विनाकारण प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न होतोय. समाजातील भेदभाव कमी व्हायची चिन्हे नाहीत. काय हाच तो भारत आहे जेथे समाजात शांतता नांदावी यासाठी अनेकांनी आपले प्राण गमावले? - अविनाश देऊळकर
पटीयाला कोर्टातील उदाहरण ताजे
न्याय व्यवस्था सांभाळणारी मंडळीच कायदा हातात घ्यायला लागली तर कसे होईल. एखाद्या गोष्टीला विरोध असेल तर तो विरोध दर्शविण्याची एक पद्धत असते. त्यासाठी हिंसक होण्याची गरज नाही. असे हिंसक होताना अनेकदा मूळ विषय बाजूला पडून व्यक्तीगत द्वेष आपल्यावर हावी होत असतो. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने असे घडणे योग्य नाही. ?
- निहाल गुप्ता