​ट्विटर-पिंटरेस्टपेक्षा ‘स्नॅपचॅट’ प्यॉप्यूलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 15:49 IST2016-06-11T10:19:46+5:302016-06-11T15:49:46+5:30

अमेरिकेत तर या वर्षीच्या शेवटी ‘स्नॅपचॅट’ यूजर्सची संख्या ट्विटर आणि पिंटरेस्टपेक्षा जास्त होणार

'Snapchat' populer than Twitter-Pintrest | ​ट्विटर-पिंटरेस्टपेक्षा ‘स्नॅपचॅट’ प्यॉप्यूलर

​ट्विटर-पिंटरेस्टपेक्षा ‘स्नॅपचॅट’ प्यॉप्यूलर

सोशल मीडियावर सतत काही तरी नावीन्यपूर्ण ट्रेंड्स येत असतात. सध्या ‘स्नॅपचॅट’ची नेटिझन्सना मोठ्या प्रमाणात भुरळ पडत आहे. विशेष करून तरुणांमध्ये ही क्रेझ अधिक दिसून येतेय.

अमेरिकेत तर या वर्षीच्या शेवटी ‘स्नॅपचॅट’ यूजर्सची संख्या ट्विटर आणि पिंटरेस्टपेक्षा जास्त होणार असल्याचे भाकित तज्ज्ञांनी केले आहे.

वर्षाअखेर अमेरिकेत स्नॅपचॅट वापरणाऱ्यांची संख्या 27 टक्क्यांनी वाढून ती 5.86 कोटीवर पोहचणार आहे. याचाच अर्थ की देशातील प्रत्येक पाचवा व्यक्ती स्नॅपचॅट यूजर असणार.

यावर्षी 5.68 कोटी ट्विटर यूजर्स तर 5.46 कोटी पिंटरेस्ट यूजर्स असणार. 2020 सालापर्यंत स्नॅपचॅटचा यूजर बेस 8.55 कोटीपर्यंत वाढू शकतो असे एका ई-मार्केटिंग कंपनीने सांगितले.

स्नॅपचॅटची पॉप्यूलॅरिटी जरी उर्ध्वगतीने वाढत असली तरी निदान ‘फेसबुक’चे अग्रस्थान कायम राहणार. ‘फेसबुक मेसेंजर’ अ‍ॅप यूजर्सची संख्या एकट्या अमेरिकेत यावर्षी 10.52 कोटी तर 2020 मध्ये 13.92 कोटी होईल. 

संपूर्ण जगाचा विचार केला असता स्नॅपचॅटचे एकुण दहा कोटी यूजर्स आहेत. ‘स्नॅपचॅट’द्वारे तुम्ही फोटो, व्हिडिओ, टेक्स्ट मेसेजद्वारे चॅट करू शकता. फरक एवढाच की, मेसेज पाहिल्यावर काही काळाने तो नाहिसा होतो. काही रिपोर्टनुसार या सर्व्हिसवर दर दिवशी 1 हजार कोटी व्हिडिओ व्ह्युवज् मिळतात.

 

Web Title: 'Snapchat' populer than Twitter-Pintrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.