'स्नॅपचॅट' यूर्जस सर्वात जास्त खूश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:26 IST2016-01-16T01:15:06+5:302016-02-06T14:26:58+5:30

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामपेक्षा स्नॅपचॅट यूर्जस जास्त खूश असतात. 

'Snapchat' is the most pleased with the jugglers | 'स्नॅपचॅट' यूर्जस सर्वात जास्त खूश

'स्नॅपचॅट' यूर्जस सर्वात जास्त खूश

शल मीडियाच्या अतिवापरामुळे होणार्‍या दूष्परिणामांचे वेळोवेळी पाढे वाचले जातात. मात्र एका नवीन संशोधनातून असे दिसून आले की फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामपेक्षा स्नॅपचॅट यूर्जस जास्त खूश असतात.

इन्फॉरमेशन, कम्युनिकेशन अँड सोसायटी नावाच्या जर्नलमध्ये हे अध्ययन प्रकाशित झाले आहे. मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी स्मार्टफोन वापरणार्‍या १५४ कॉलेज विद्यार्थ्यांना दोन आठवडे रोज सहा मेसेज पाठविले. मेसेजमध्ये त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे त्यांना बंधनकारक होते.

ते कोणती सोशल साईट वापरत आहे, कोणाशी बोलत आहे, चॅट करताना मन:स्थिती कशी आहे असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. यातून असे दिसून आले, की फेसबुकवर ऑनलाईन यूर्जसपेक्षा स्नॅपचॅट यूर्जस अधिक खूश होते.

एवढेच नाही तर स्नॅपचॅटवर येणार्‍या मेसेजकडे विद्यार्थी अधिक लक्ष देतात. याचे कारण की, स्नॅपचॅटवर लोकांना जास्त सुरक्षित वाटते. समोरासमोर बसून बोलण्यासारखा अनुभव स्नॅपचॅटवर येतो असे या संसोधनात सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले.

Snapchat User
 

Web Title: 'Snapchat' is the most pleased with the jugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.