मुलांपेक्षा मुलीनांच स्मार्टफोनचे ‘याड’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 22:33 IST2016-06-08T17:03:00+5:302016-06-08T22:33:00+5:30
मुली मुलांपेक्षा जास्त वेळ स्मार्टफोनवर घालवतात तसेच मोबाईलचे व्यसन लागण्याची शक्यतादेखील त्यांना अधिक असते.

मुलांपेक्षा मुलीनांच स्मार्टफोनचे ‘याड’
स मार्टफोनसारख्या टेक्नो गॅजेट्सचे वेड मुलांना अधिक असते असा जर तुमचा समज असेल तर तो आधी काढून टाका.
कारण एका रिसर्चमध्ये असे दिसून आले की, मुली मुलांपेक्षा जास्त वेळ स्मार्टफोनवर घालवतात तसेच मोबाईलचे व्यसन लागण्याची शक्यतादेखील त्यांना अधिक असते. या विषयावरील हे पहिलेच शैक्षणिक संशोधन आहे.
दक्षिण कोरियामध्ये करण्यात आलेल्या या अध्ययनात सहभागी झालेल्या एकूण महिलांपैकी सुमारे 52 टक्के महिला दिवसभरातून चार तास स्मार्टफोनचा वापर करतात अशी माहिती समोर आली.
पुरुषांमध्ये हेच प्रमाण केवळ 29.4 टक्के एवढे आहे. विशेष म्हणजे 22.9 महिला तर केवळ 10.8 पुरुष दररोज सहा तास स्मार्टफोनचा वापर करतात.
अजौउ विद्यापीठातील प्रा. चँग जे-येओन यांनी माहिती दिली की, सुवौन प्रांतातील सहा कॉलेजसमधील एकूण 1236 विद्यार्थ्यांचा या संशोधनामध्ये अभ्यास करण्यात आला.
महिलांमध्ये स्मार्टफोनची एवढी क्रेझ खरंच आश्चर्यकारक आहे. त्यामुळे मोबाईलपासून थोडा वेळ दूर राहण्याचा आम्ही त्यांना सल्ला दिला.