​‘ग्रेट’ कॉफी बनविण्याचा सिंपल फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 16:24 IST2016-05-08T10:54:06+5:302016-05-08T16:24:49+5:30

एक सिंपल उपाय कॉफी करताना करायलाच पाहिजे.

The simple fund to make 'Great' coffee | ​‘ग्रेट’ कॉफी बनविण्याचा सिंपल फंडा

​‘ग्रेट’ कॉफी बनविण्याचा सिंपल फंडा

ाळी उठल्यावर फ्रेश वातावरणात जर गरमा गरम स्ट्राँग मिळाली तर क्या बात है! दिवसाची सुरूवात यापेक्षा चांगली करण्यासाठी यासारखा दुसरा पर्याय नाही.

पण जर का कॉफी खराब असेल तर? तर मग तुमचा अख्खा दिवस वाया गेला म्हणून समजा.

असे होऊ द्यायचे नसेल तर एक सिंपल उपाय कॉफी करताना करायलाच पाहिजे. एक चांगली कॉफी तयार करण्यासाठी कॉफीच्या बिया फ्रेश असणे सर्वाधिक गरजेचे असते. तुमच्या जीभेवर रेंगाळणारी चवी हवी असल्यास फ्रेश कॉफीबीन्स पाहिजे म्हणजे पाहिजेच. 

त्यानंतरची स्टेप म्हणजे, थंड पाणी. कॉफीबीन्सचा जास्तीत जास्त फ्लेवर मिळवण्यासाठी पाणी 90 ते 96 डिग्री सेल्सिअस गरम असले पाहिजे. म्हणजे तुम्ही जर आधीच थोडे कोमट पाणी घेतले तर तापमानाचा अंदाज चुकू शकतो आणि कॉफी ओव्हरहीट होईल.

एवढे करूनही तुमच्य स्वप्नातील कॉफी तयार झाली नाही तर प्रॉब्लेम कॉफीबीन्समध्ये आहे. चांगल्या प्रतीच्या कॉफी खरेदी करून वरील स्टेप्स फॉलो करा.

आणि शेवटी एक गोष्ट : नेहमी ध्यानात ठेवा की चहाप्रमाणे कॉफी बनवत नसतात. कधीच नाही!

Web Title: The simple fund to make 'Great' coffee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.