सिद्धार्थ जाधवला बनायचे होते...‘इन्स्पेक्टर’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 04:36 IST2016-03-18T11:36:00+5:302016-03-18T04:36:00+5:30
आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही बनण्याची इच्छा असते. कोणी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतो

सिद्धार्थ जाधवला बनायचे होते...‘इन्स्पेक्टर’
आ ुष्यात प्रत्येकाला काही ना काही बनण्याची इच्छा असते. कोणी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतो तर कोणी इंजिनिअर. मात्र आपल्या सर्वांचा लाडका मराठी चित्रपटाचा विनोदी नायक सिद्धार्थ जाधवला बनायचे होते ‘इन्स्पेक्टर’. तो पण चित्रपटातला नव्हे, तर खराखुरा इन्स्पेक्टर....
सिद्धार्थ जाधव एका सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी जळगावात आला असता आमच्या ‘लोकमत-सीएनएक्स’ प्रतिनिधीने, ‘चित्रपटाकडे कसा वळला?’ असा प्रश्न केला असता त्याने सांगितले की, ‘मी चित्रपटात काम करेल आणि हिरो बनेल, असे मला वाटले पण नव्हते. मला आयुष्यात ‘इन्स्पेक्टर’ बनायचे होते. मात्र शाळा, कॉलेजमध्ये एकांकीका, नाटक, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्यातील अभिनय कला विकसित झाली आणि चित्रपटात माझे पदार्पण कसे झाले हे मला कळलेच नाही,’ असे त्याने सांगितले.