​सिद्धार्थवर अक्षय चिडला, अभिषेकचं स्पष्टिकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 15:19 IST2016-05-26T09:49:41+5:302016-05-26T15:19:41+5:30

कॉमेडी नाईट्स बचाओ या शोच्या सेटवर मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधववर अक्षयकुमार चिडल्याप्रकरणी खुलासा समोर आला आहे.

Siddharth explains Akshay Chidla, Abhishek ... | ​सिद्धार्थवर अक्षय चिडला, अभिषेकचं स्पष्टिकरण...

​सिद्धार्थवर अक्षय चिडला, अभिषेकचं स्पष्टिकरण...

मेडी नाईट्स बचाओ या शोच्या सेटवर मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधववर अक्षयकुमार चिडल्याप्रकरणी खुलासा समोर आला आहे. 'हाऊसफुल्ल 3' मधला अक्षयचा सहकलाकार अभिषेक बच्चनने मजामस्तीत हा प्रकार घडल्याचं स्पष्ट केलं आहे.
 
ते एका कॉमेडी शोमध्ये गेले होते, साहजिकच त्यांची टीम आमच्या टीमची टेर खेचत होती. त्यामुळे आमच्या हाऊसफुल्लच्या टीमनेही त्यांची मस्करी करायचं ठरवलं. मात्र दुदैर्वाने अर्धीच बातमी बाहेर आली आणि अक्षय सिद्धार्थवर चिडल्याचे गैरसमज पसरले. असं अभिषेकने सांगितल्याचं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलं आहे.

अक्षयकुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या हाऊसफुल्ल 3 चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय, रितेश, लिझा हेडन आणि जॅकलिन फर्नांडिस कलर्सवरील कॉमेडी नाईटस बचाओ या कार्यक्रमात आले होते. एआयबी रोस्टच्या धर्तीवर असलेल्या या कार्यक्रमात नेहमीच पाहुण्यांची टर उडवली जाते. मात्र यावेळी विनोदाच्या नावाखाली केला जाणारा लिझाचा अपमान अक्षयला आवडला नाही आणि त्याचा पारा चढला, असं सांगितलं गेलं.

आॅस्ट्रेलियाहून आलेल्या लिझा हेडनला सिद्धार्थ जाधवच्या स्कीटमध्ये कांगारु असं संबोधण्यात आलं. याचप्रमाणे आणखी एक वर्णद्वेषी कमेंट केल्यामुळे लिझा आणि जॅकलिन अनकम्फर्टेबल असल्याचं रितेश आणि अक्षयला जाणवलं. लिझाला जी भाषा समजतही नाही, त्या भाषेत तिच्यावर विनोद करणं अशोभनीय असल्याचं मत अक्षयने व्यक्त करत तात्काळ सिद्धार्थला थांबवल्याची माहिती होती.

सिद्धार्थ जाधवने मात्र असं काहीच घडलं नसल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं होतं. त्यामुळे हा पब्लिसिटी स्टंट असल्याची चचार्ही तेव्हा सुरु होती.

Web Title: Siddharth explains Akshay Chidla, Abhishek ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.