सुशांत गोएंकाचे शुभमंगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 08:53 IST2016-02-13T15:53:56+5:302016-02-13T08:53:56+5:30

प्रसिद्ध उद्योजक संजीव गोएंका यांचा मुलगा सुशांत याचा विवाह नुकताच शिविका झुनझुनवाला हिच्याशी झाला.

Shubhamangal of Sushant Goenka | सुशांत गोएंकाचे शुभमंगल

सुशांत गोएंकाचे शुभमंगल

रसिद्ध उद्योजक संजीव गोएंका यांचा मुलगा सुशांत याचा विवाह नुकताच शिविका झुनझुनवाला हिच्याशी झाला. कोलकाता येथे 29 जानेवारी रोजी विवाहाचा मुख्य सोहळा झाला. तो तीन दिवस सुरू होता. हाच दिवस संजीव गोएंका यांचा वाढदिवसही होता. 
शिविका ही सूर्या झुनझुनवाला यांची कन्या असून ते सिंगापूर येथील नॉमी हॉस्पिटलचे प्रमुख आहेत.या विवाहसोहळ्याला साडेसातहजार पाहुण्यांनी हजेरी लावून नवदांपत्याला आशीर्वाद दिले. यात उद्योगपती, राजकीय नेते, क्रिकेटपटू, अभिनेते- अभिनेत्री आदींचा समावेश होता. 



अंबानी बंधू, उदय कोटक, सज्जन ंिजंदल, दिलीप संघवी, पवन मुंजाल, राजश्री बिर्ला यांनीही हजेरी लावली. या सोहळ्याचे एक आकर्षण म्हणजे ‘सिर्क दू सोलेली’ या थिएटरग्रुपने सादर केलेला कार्यक्रम. हिंदी गीतांवर केलेल्या नृत्याने उपस्थितांची दाद घेतली. तीन दिवस खवय्यांची चांगलीच काळजी घेण्यात आली होती. पारसी, मारवाडी, सिंधी, श्रीलंकन, आणि पेरूवियन जेवणाची सोय करण्यात आली होती. पारंपजरक भारतीय गोड पदार्थांचीही रेलचेल होती.

Web Title: Shubhamangal of Sushant Goenka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.