शूटिंगला बाय-बाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:29 IST2016-01-16T01:14:23+5:302016-02-07T06:29:55+5:30

अभिनेत्री रीज विदरस्पूनचे म्हणणे आहे, की तिने अभिनयाच्या कामाचे ओझे कमी केले असून, पुढच्या काळात परिवाराला अधिक वेळ देण्याचे ठरविले आहे. 

Shooting By-Bye | शूटिंगला बाय-बाय

शूटिंगला बाय-बाय

िनेत्री रीज विदरस्पूनचे म्हणणे आहे, की तिने अभिनयाच्या कामाचे ओझे कमी केले असून, पुढच्या काळात परिवाराला अधिक वेळ देण्याचे ठरविले आहे. विदरस्पून पती जिम टोथसह तिच्या तीन मुलांबरोबर राहते. ऑस्करविजेती विदरस्पूनचा 'हॉट परस्यूट' हा चित्रपट मे २0१४ मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर तिचा एकही चित्रपट रिलीज झाला नाही. तसेच ती कुठल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्येही व्यस्त नाही.
अँक्टिंग करणे अवघड
अभिनेत्री मॅगी स्मिथला अजूनही असे वाटते, की अँक्टिंग करणे सोपे नाही. हॅरी पॉटर या चित्रपटातील ८0 वर्षीय स्मिथ हीने बर्‍याच चित्रपटांमध्ये अभिनयाची छाप पाडली आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करणे हे प्रत्येकाला अवघड वाटते. मात्र ती आपल्या कामाबाबत अधिक सतर्कता बाळगत असल्यानेच इतरांना माझ्यासोबत काम करताना अवघड वाटत असल्याचे सांगते. ती म्हणते, की माझ्या स्वभावाबाबत स्टार मंडळी चर्चा करतात, मात्र मी परफेक्ट काम करण्यास प्राधान्य देते.

Web Title: Shooting By-Bye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.