SHOCKING : ‘या’ प्लेयरला अनोळखी लोकांसमोर करावे लागले टॉपलेस फोटोशूट, धक्कादायक खुलासा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 14:49 IST2017-03-30T09:19:42+5:302017-03-30T14:49:42+5:30
एका आंतरराष्ट्रीय टेनिस प्लेयरला अनोळखी लोकांसमोर टॉपलेस फोटोशूट करावे लागल्याचा धक्कादायक प्रकार तिनेच खुलासा करुन उघडकीस आणला.
(43).jpg)
SHOCKING : ‘या’ प्लेयरला अनोळखी लोकांसमोर करावे लागले टॉपलेस फोटोशूट, धक्कादायक खुलासा !
ए ा आंतरराष्ट्रीय टेनिस प्लेयरला अनोळखी लोकांसमोर टॉपलेस फोटोशूट करावे लागल्याचा धक्कादायक प्रकार तिनेच खुलासा करुन उघडकीस आणला. जगातील सर्वात हॉट टेनिस प्लेयर्सपैकी एक असलेली कॅनडाची यूजिनी बुचार्डने हा धक्कादायक खुलासा केला आहे. तिने नुकतेच सोशल मीडियात स्पोर्ट्स इलेस्ट्रेटेड मॅगझीनसाठी फोटोशूट केलेले हॉट फोटोज शेयर केले होते. ज्यात ती टॉपलेस दिसली. यूजिनीने सांगितले की, हे फोटोशूट आपल्या मर्जीने केले नाही. तर, स्पॉन्सरने तिला बिकिनी घालण्यासाठी सांगितले होते. बुचार्डने सांगितले की, ‘हे फोटोशूट खूपच सिक्रेट ठेवले गेले. फोटोशूटच्या आदल्या रात्री मी ठीकपणे झोपूही शकले नाही. मी पहाटे 5 वाजता उठून सर्व उरकल्यानंतर जेव्हा बिकिनी घालू लागले तेव्हा स्टायलिस्टने सांगितले की, तुला टॉप नाही घालायचा. कारण पहिला फोटो टॉपलेस घेतला जाणार आहे’.
![]()