...तर ही आहे शाहरुख खानची मुलगी ‘सुहाना’ची लाइफस्टाइल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 16:06 IST2017-05-24T09:58:53+5:302017-05-24T16:06:38+5:30
सेलिब्रिटी किड्स हेदेखील सेलिब्रिटींपेक्षा कमी नसतात. त्यांंच्याबाबतीत जाणून घेण्यासाठीही सर्वसामान्यांची धडपळ ही जगावेगळी असते.
.jpg)
...तर ही आहे शाहरुख खानची मुलगी ‘सुहाना’ची लाइफस्टाइल !
सेलिब्रिटी किड्स हेदेखील सेलिब्रिटींपेक्षा कमी नसतात. त्यांंच्याबाबतीत जाणून घेण्यासाठीही सर्वसामान्यांची धडपळ ही जगावेगळी असते. त्यातच सुपरस्टार आणि त्याचा मुलगा किंवा मुलगी यांची लाइफस्टाइल जाणून घेण्यासाठी तर नको ते प्रयत्न केले जातात. आज बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याची मुलगी सुहाना हिच्या लाइफस्टाइलविषयी जाणून घेऊया.
सुहाना तशी नेहमी चर्चेत राहत असते. विशेष म्हणजे विविध कार्यक्रमांमधील तिची उपस्थिीत केंद्रबिंदू ठरते. त्यातच कॅमेऱ्यासमोरील तिचा वावर नेहमीच अनेकांना प्रभावित करतो. सुहानाच्या एक सांगायचे झाले तर ती शिक्षणावर जास्तच लक्ष कें द्रित करताना दिसत आहे, म्हणून सुहाना सध्या तरी सोशल मीडिया अकाऊंटवर फारशी सक्रिय नाही.
सुहाना लंडनमधील एका प्रतिष्ठीत विद्यालयात शिक्षण घेत आहे. ती १७ वर्षाची झाली असून नुकताच लंडनमध्ये तिने मोठ्या उत्साहात वाढदिवसही साजरा केला.

* डान्समध्ये अव्वल आहे सुहाना
सुहानाला डान्सची खूपच आवड असून डान्समध्ये अव्वलही आहे. नृत्यदिग्दर्शक शामक दावर हे तिचे नृत्य शिक्षक असून त्यांच्याकडून तिने रितसर प्रशिक्षण घेतले आहे. सोशल मीडियावरही शामक दावरच्या ‘समर डान्स फंक शो’मधील व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

* झिआन मलिकची फॅन आहे सुहाना
सुहानाचे वडील शाहरुखचे लाखो-करोडो फॅन आहेत मात्र त्याची मुलगी सुहाना ही पॉप संगीतकलेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असणाºया झिआन मलिक या गायकाची फॅन आहे. त्यामुळे शाहरुखची ही मुलगी कोणा दुसºया कलाकाराचीच ‘फॅनगर्ल’आहे असं म्हणायला हरकत नाही. एकेदिवशी कार्यक्रमाच्या निमित्ताने शाहरुखने झिआनसोबत सेल्फी काढला होता.
* सुहानाचे लवकरच बॉलिवूड पदार्पण ?
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर सुहानाच्या शालेय कार्यक्रमादरम्यानचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिच्या अभिनय कौशल्याची झलकही पाहायला मिळाली होती. त्यामुळे तिचे हे सर्व पैलू पाहता येत्या काळात सुहानासुद्धा बॉलिवूडमध्ये झळकू शकते अशा चर्चा रंगल्या आहेत.
Also Read : Birthday Special : ‘सुपरस्टार’पेक्षा कमी नाही, शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान!