'स्पेक्टर'ला मिळाली शाही दाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:29 IST2016-01-16T01:16:12+5:302016-02-07T06:29:29+5:30
जेम्स बॉण्ड पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढविण्यासाठी सज्ज झाला आहे. 'स्पेक्टर' या चित्रपटाचा ...

'स्पेक्टर'ला मिळाली शाही दाद
ज म्स बॉण्ड पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढविण्यासाठी सज्ज झाला आहे. 'स्पेक्टर' या चित्रपटाचा प्रिमियर सोमवारी झाला. या प्रिमियरला राजघराण्याची उपस्थिती लाभल्यामुळे या चित्रपटाला वेगळेच वलय प्राप्त झाले आहे. यावेळी प्रिन्स विल्यम्स, पत्नी केट आणि भाऊ प्रिन्स हॅरी यांनी या चित्रपटाचा आनंद लुटला. समीक्षकांनी या चित्रपटाची खूपच प्रशंसा केली असून सॅम मेन्डीस यांचे दिग्दर्शन आहे. यात डेनियल क्रेग यांची प्रमुख भूमिका आहे. लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमाच्या वेळी क्रेग म्हणाला, पडद्यावर स्वत:ला पाहणे मला आवडत नाही. पण मला जेम्स बॉण्डची भूमिका करायला खूप आवडले. या वेळी सहकारी कलावंत मोनिका बलुची आणि ली सेडॉक्स याही उपस्थित होत्या.