ही आहे छाया मोहिते, मुंबईची पहिली महिला रिक्शा चालक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 11:31 IST2017-04-19T06:01:54+5:302017-04-19T11:31:54+5:30
छाया सांगते की, ‘हे काम घरगुती कामांपेक्षा खूप चांगले आहे. या कामात मी जास्त पैसा कमवू शकते आणि माझे भविष्यदेखील उज्ज्वल असेल.

ही आहे छाया मोहिते, मुंबईची पहिली महिला रिक्शा चालक !
द शाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये १९ महिलांनी आॅटो रिक्शा चालवायला सुरु केले आहे. यांना महाराष्ट्र शासनाने महिला सशक्तिकरण योजनेद्वारे आॅटो रिक्शा चालविणे शिकविले. यामधील एक महिला आहे ४५ वर्षीय छाया मोहिते. छाया सांगते की, ‘हे काम घरगुती कामांपेक्षा खूप चांगले आहे. या कामात मी जास्त पैसा कमवू शकते आणि माझे भविष्यदेखील उज्ज्वल असेल. तीन मुलांची ही आई मागिल दोन महिन्यात मुंबईच्या एका सरकारी ट्रेनिंग सेंटमध्ये रिक्शा चालवायला शिकली. मोहिते आनंदी होऊन सांगते की, अजून पर्यंत मला सायकल चालवायला येत नव्हते, आता मात्र मी रिक्शा चालवू शकते. ती आता आत्मनिर्भर झाली आहे.
राज्य सरकारने एक नवी योजना सुरु केली असून ज्यानुसार महाराष्ट्रात रिक्शा परमिट महिलांसाठी पाच टक्के आरक्षित ठेवण्यात आले आहे. ही योजना गेल्या वर्षी महाराष्ट्रात सुरु झाली होती, मात्र मोहिते आणि तिच्या सारख्या अन्य महिला या महानगरात आॅटो चालविणाऱ्यामध्ये पहिल्या महिलांच्या यादीत समाविष्ट झाल्या.