पॉर्न पाहून वाढत नाही लैंगिक अतिरेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:01 IST2016-01-16T01:12:41+5:302016-02-06T12:01:54+5:30
अनेक जणांचा असा समज असतो की पॉर्न फिल्म्समुळे समाजात लैंगिक ...

पॉर्न पाहून वाढत नाही लैंगिक अतिरेक
अ ेक जणांचा असा समज असतो की पॉर्न फिल्म्समुळे समाजात लैंगिक अत्याचार वाढतो. पॉर्नमुळेच मुलांमध्ये लैंगिक विकृती वाढते. परंतु एका नव्या सर्वेक्षणातून असे दिसून आले की, जे लोक सेक्स अँडिक्ट आहेत, त्यांना पॉर्न पाहण्यात काही रस नाही. उलटपक्षी त्यांना पॉर्न पाहणे लाजिरवाणे वाटते. क्रोशियन संशोधकांनी हा सर्व्हे केला आहे.
यामध्ये सुमारे दोन हजार पुरुषांचा सामावेश करण्यात आला होता ज्यांची तीन गटांत विभागणी करण्यात आली होती. हायपर सेक्शुअल डिसाऑर्डर, हाय सेक्स ड्राईव्ह आणि कंट्रोल ग्रुप असे ते तीन गट होते. विश्लेषात्मक अध्ययनानंतर असे दिसून आले की, तीव्र सेक्सची इच्छा असलेल्या पुरुषांना पॉर्न पाहण्यात काहीच रस नाही. त्यामुळे हा समज खोटा ठरतो की पॉर्न पाहिल्यामुळे लोक उद्यीपित होतात. 'जर्नल ऑफ सेक्स आणि मॅरिटल थेरपी ' मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.