चेहर्‍यावरून कळते लैगिंक एकनिष्ठता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:44 IST2016-01-16T01:20:14+5:302016-02-07T13:44:07+5:30

शीर्षक वाचून आर्श्‍चय वाटले असेल नाही? पण, हे खरे आहे. महिलेच्या केवळ चेहर्‍याकडे पाहून तिच्या लैंगिक एकनिष्ठतेचा अंदाज लावता येतो, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

Sexual Integrity From Faith! | चेहर्‍यावरून कळते लैगिंक एकनिष्ठता!

चेहर्‍यावरून कळते लैगिंक एकनिष्ठता!


/>या संशोधनात हेही सांगण्यात आले आहे की, पुरुष दोन पैकी एका महिलेला निष्ठावान म्हणून फक्त छायाचित्रावरूनही निवडू शकतात. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. 'पीएलओएस'मध्ये ते प्रकाशितही झाले आहे. या संशोधनादरम्यान झालेल्या दोन प्रयोगानुसार, संशोधकांनी ३४ छायाचित्रे वापरली आहेत. ज्यात २0 ते ४२ वयाच्या महिलांची छायाचित्रे आहेत. ज्यात ही माहितीसुद्धा दिली आहे की, त्यांनी आतापर्यंत किती लोकांना फसविले आहे. या महिलांच्या १७ जोड्या करण्यात आल्या होत्या.
प्रत्येक जोडीतील एका महिलेने दोन किंवा अधिक वेळा जोडीदाराला फसविलेले होते. आणि दुसर्‍या महिलेनी असा प्रयत्न कधी केलाच नव्हता. याच प्रयोगात ४३ सहभागीदारांना या महिलांच्या जोड्यांचे फोटो दाखविण्यात आले आणि त्यातून त्यांना हे सांगण्यात आले की, त्यांच्या मताप्रमाणे या जोडीतील निष्ठावान महिला कुठली हे शोधून काढा तर इतर २९ सहभागीदारांना प्रत्येक महिलेच्या विश्‍वासाहर्तचे गुणांकन करण्यास सांगण्यात आले. या संशोधनातून असे समोर आले की विश्‍वास ठेवण्यावर आणि निष्ठा असण्यामध्ये एकप्रकारचा संबंध आहे. याच क्रमातील दुसर्‍या प्रयोगात ६0 पुरुषांचा सहभाग होता. ज्यात हे बघण्यात आले की, या पुरुषांच्या प्रारंभिक संशोधनाची प्रतिकृती ते उभी करू शकतात किंवा नाही. यावेळी असे निर्दशनास आले की, पुरुष हे अचूक ठरू शकतात.

Web Title: Sexual Integrity From Faith!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.