​सेक्स वर्कर्स होताहेत बेघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 15:16 IST2016-05-29T09:46:01+5:302016-05-29T15:16:01+5:30

मुंबईतील कमाठीपुरा हा सर्वात जुना आणि आशियातील दुसरा सर्वात मोठा रेड लाइट एरिया म्हणून ओळखला जातो.

Sex workers are homeless | ​सेक्स वर्कर्स होताहेत बेघर

​सेक्स वर्कर्स होताहेत बेघर

ंबईतील कमाठीपुरा हा सर्वात जुना आणि आशियातील दुसरा सर्वात मोठा रेड लाइट एरिया म्हणून ओळखला जातो. कमाठीपुरा पूर्वी लाल बाजार या नावाने प्रचलित होता. काही काळाने येथे राहणाºया वर्कर्समुळे (कमाठी) त्याची कमाठीपुरा म्हणून ओळख झाली. आता मात्र कमाठीपुºयातील सेक्सवर्कस यांना बेघर होऊन उपासमारीची वेळ आली आहे.

वृत्तानूसार या भागात नोकरदार वर्गाच्या लोकांचे वास्तव्य वाढल्याने वेश्याव्यवसायावर परिणाम झाला असून मंदीचे सावट आले आहे.  मुंबईतील बिल्डर्सनी या भागातील अनेक बिल्डिंग खरेदी केल्या आहेत. भविष्यात या भागात मोठ मोठ्या बिल्डींगाची उभारणी होणार असून या बदनाम गल्लीचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याचे चित्रही दिसत आहे.

Web Title: Sex workers are homeless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.