येरुसलेम हॉटेलचा निराळा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 07:24 IST2016-02-27T14:24:46+5:302016-02-27T07:24:46+5:30

29 फेब्रुवारी रोजी हॉटेलमध्ये थांबण्याऱ्या जोडप्यांपैकी ज्या जोडप्यांना बाळ होईल त्यांतील दोन पहिल्या जोडप्यांना 99.3 हजार डॉलर्सचे आकर्षक पॅकेज देण्यात येईल.

A separate hotel in Jerusalem hotel | येरुसलेम हॉटेलचा निराळा फंडा

येरुसलेम हॉटेलचा निराळा फंडा

र्केटिंगच्या नावाखाली काय करण्यात येईल हे सांगता येत नाही. आता येरुसलेम येथील हॉटेल येहुदाचेच उदाहरण घ्या ना. चार वर्षांनी येणाऱ्या 29 फेब्रुवारीचा फायदा घेण्यासाठी या हॉटेलने निराळीच आॅफर सुरू केली आहे.

तुम्ही जर बाळाची प्लॅनिंग करत असाल तर ही आॅफर तुमच्यासाठी आहे. आॅफरनुसार 29 फेब्रुवारी रोजी हॉटेलमध्ये थांबण्याऱ्या जोडप्यांपैकी ज्या जोडप्यांना नऊ महिन्यांनी बाळ होईल त्यांतील दोन पहिल्या जोडप्यांना 99.3 हजार डॉलर्सचे आकर्षक पॅकेज देण्यात येईल.

यंदाचे ‘डबल एन्टेंंड्रे लीप इयर’ आहे. हिब्रु भाषेत याचा अर्थ ‘गर्भधारणा वर्ष’ असा होतो. याचे औचित्य साधून हॉटेल अशी अनोखी आॅफर सुरू केली आहे. ज्यामध्ये ब्रिस, बार मित्झ्वा आणि लग्न असे 99.3 हजार डॉलर्सचे पॅकेज देण्यात येणार. डॉक्टरांच्या प्रमाणपत्राच्या आधारेच नऊ महिन्यांनी बक्षीस मिळणार.

Happy Baby

हॉटेलने माहिती दिली की, आतापर्यंत 50 टक्के बुकिंग झालेली आहे. आॅनलाईन ट्रॅव्हेल साईट एक्सपेडियाने देखील त्यांच्या यूजर्सना 29 फेब्रुवारी रोजी हॉटेल बुकिंगवर 29 टक्के सूट आॅफर केली आहे.

Web Title: A separate hotel in Jerusalem hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.