सेल्फी आॅफ ए लाइफटाइम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 10:59 IST2016-03-16T17:57:15+5:302016-03-16T10:59:05+5:30
दुबई येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी बॉलीवुड सुपरस्टार अक्षय कुमार याने हॉलीवुड अभिनेत्री सलमा हायक हिची भेट घेतली.

सेल्फी आॅफ ए लाइफटाइम
द बई येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी बॉलीवुड सुपरस्टार अक्षय कुमार याने हॉलीवुड अभिनेत्री सलमा हायक हिची भेट घेतली. यावेळी अक्षयला तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. हा सेल्फी फोटो त्याने लगेचच ट्विटरवर शेअर केला असून, त्याखाली ‘सेल्फी आॅफ ए लाइफटाइम... सर्व शिक्षकांसाठी समर्पित...’ असे लिहले. वैश्विक ग्लोबल एज्युकेशन अॅँड स्किल फोरमतर्फे दुबई येथे शिक्षक सन्मान समारंभाचे आयोजन केले होते. समारंभात फलस्तीन येथील एका शरणार्थी शिक्षकाला दहा लाख अमेरिकी डॉलरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात आॅस्कर पुरस्कार विजेता मॅथ्यू मॅक्कनागे, अभिषेक बच्चन, परिणिती चोपडा, अली जाफर आदी उपस्थित होते.
![akshay kumar]()