​सतत स्वत:चे सेल्फी काढणारे असतात आत्मकेंद्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2016 10:14 PM2016-04-12T22:14:18+5:302016-04-12T15:14:18+5:30

आत्मकेंद्री लोक सर्वात जास्त स्वत:चे सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. 

Self-propelled self self-propelled autism | ​सतत स्वत:चे सेल्फी काढणारे असतात आत्मकेंद्री

​सतत स्वत:चे सेल्फी काढणारे असतात आत्मकेंद्री

googlenewsNext
ल्फी काढण्याची क्रेझ आता सगळीकडेच पसरली आहे. तुम्हाला देखील स्वत:चे सेल्फी काढण्याचा छंद असेल तर थोडा विचार करण्याची गरज आहे.

कोरियन संशोधकांच्या मते, आत्मकेंद्री लोक सर्वात जास्त स्वत:चे सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. आपल्या फोटोवर इतर लोक काय म्हणतात हे जाणून घेण्यातही त्यांना खूप रस असतो.

इंग्रजीमध्ये याला ‘नारसिसिस्टिक पर्सनालिटी’ म्हणतात. हा एक मानसिक आजार असून केवळ आपण म्हणजेचे मोठे अशी या लोकांची वृत्ती असते.

ब्रसल्स येथील व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी मेडिकल इन्स्टिट्यूटच्या ब्रेंडा के. विंडरहोल्ड म्हणतात, लोकांची सहानुभूती आणि प्रशंसाचे भुकेले हे लोक सोशल मीडियावर स्वत:चे सेल्फी काढून मोठ्या प्रमाणात पोस्ट करत असतात.

आत्मकेंद्रीपणा आणि सेल्फीच्या माध्यमातून स्वप्रचार यांच्यातील परस्पर संबंध या संशोधनातून उजागर करण्यात आला आहे. आत्मकेंद्रीपणा अधिक असलेल्या लोकांमध्ये सेल्फी पोस्ट करण्याची वृत्ती जास्त असते, अशी माहिती कोरियन विद्यापीठातील जंग-अह ली आणि योगजून संग यांनी दिली.

Web Title: Self-propelled self self-propelled autism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.