​दुसरी पार्वतीही बिकिनीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 15:00 IST2016-06-11T09:30:51+5:302016-06-11T15:00:51+5:30

‘देवो के देव महादेव’ या हिंदी धार्मिक मालिकेतील पार्वतीची भूमिका साकारणाºया सोनारिका भदोरीया या अभिनेत्रींचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

Second Parvati bikinit | ​दुसरी पार्वतीही बिकिनीत

​दुसरी पार्वतीही बिकिनीत

ेवो के देव महादेव’ या हिंदी धार्मिक मालिकेतील पार्वतीची भूमिका साकारणाºया सोनारिका भदोरीया या अभिनेत्रींचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद ताजा असतानाच, आता याच मालिकेतील पार्वतीच्या भूमिकेची रिप्लेसमेंट असलेली पूजा बॅनर्जीनेही बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. त्यातून पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. पार्वतीची भूमिका करणाºया पूजा बॅनर्जीच्या बिकिनीवरील फोटोवरून सोशल मिडीयावरुन तिची खिल्ली उडवली जात आहे.

सोनारिकाने असेच फोटो शेअर केल्याने तिला टीकाकारांनी लक्ष्य केले होते, त्यामुळे तिने ते फोटो तात्काळ सोशल मीडियावरु न हटवले होते. याचदरम्यान व्हेकेशननिमित्त परदेशी गेलेल्या पूजा बॅनर्जीने बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर अपलोड के ल्याने प्रेक्षक तिच्यावर चांगलेच रागावले आहेत. यावर तिने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही, तसेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना पूजाने पुन्हा सुट्टीवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Web Title: Second Parvati bikinit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.