समुद्रकिनारी आनंद लुटण्यासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 20:45 IST2016-05-24T15:15:26+5:302016-05-24T20:45:26+5:30
काही आवश्यक गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष दिले तर ट्रिपचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो.

समुद्रकिनारी आनंद लुटण्यासाठी
ग व्यासारख्या ठिकाणी ट्रिपसाठी गेल्यावर समुद्रकिनारी फिरण्याचा मोह कोणाला आवरता येईल? मस्तपैकी मऊ मऊ वाळूत फिरताना आणि लाटांबरोबर पोहण्याची मजाच वेगळी असते.
समुद्राच्या पाण्यात धमालमस्ती करण्या आगोदर मात्र थोडी काळजी घेण्याची गरज असते. काही आवश्यक गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष दिले तर ट्रिपचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो.
डिहायड्रेशन (निर्जलीकरण) :
समुद्रकिनारी डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे किनारी फिरताना आपल्याजवळ विविध ड्रिंक्स ठेवायला पाहिजे. समुद्रात खेळताना ते पाणी नााक- तोंडात जाते. खारट पाण्यामुळे शरीरात मीठाचे प्रमाण वाढून डिहायड्रेशन होऊ शकते.
सिरका सोबत ठेवा :
समुद्रकिनारी गेल्यानंतर सोबत बॅगमध्ये सिरकाची बॉटल आवश्य ठेवावी. पाण्यामध्ये एखाद्या माशाने दंश केला तर सिरका लावावा.
मुलांवर लक्ष ठेवा :
समुद्र किनारी फिरत असताना मुलांवर लक्ष ठेवणे खूप आवश्यक असते. मुले बीचवर रस्ता विसरण्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे समुद्रकिनारी फिरायला गेल्यावर सोबत भडक आणि ब्राईट रंगाची छत्री राहू द्या. छत्री आणि टॉवेल अशा ठिकाणी ठेवा की, मुलांना ते दिसेल व ते रस्ता विसरणार नाही.
पाण्यात जास्त आत जाऊ नका :
समुद्रात खेळत असताना लोक अनेकदा किनाºयापासून खूप दूर पोहत जातात. तुम्ही कितीही एक्सपर्ट पोहणारे असला तरी असे करणे खूप धोकादायक आहे. लाटांचा वेग आणि आकाराचा अंदाज लावणे खूप कठिण असते. त्यामुळे शक्यतो किनाºयावर उभे राहूनच सुमद्राचा आनंद घ्यावा.