स्क्रीझोफ्रेनियाचे रुग्ण करतात अधिक आत्महत्येचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 08:31 IST2016-02-12T15:31:43+5:302016-02-12T08:31:43+5:30

स्क्रीझोफ्रेनियाचे रुग्ण आत्महत्येचा प्रयत्न करण्याची शक्यता सहा पटींनी जास्त असते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. 

Schizophrenia sufferers try more suicide | स्क्रीझोफ्रेनियाचे रुग्ण करतात अधिक आत्महत्येचे प्रयत्न

स्क्रीझोफ्रेनियाचे रुग्ण करतात अधिक आत्महत्येचे प्रयत्न

ong>कोणताही मानसिक रोग नसलेल्या व्यक्तीच्या तुलनेत स्क्रीझोफ्रेनियाचे रुग्ण आत्महत्येचा प्रयत्न करण्याची शक्यता सहा पटींनी जास्त असते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. 

टोरोंटो विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासाअंती समोर आलेल्या आकडेवारीनुसार लहानपणी शारीरिक अत्याचार झालेल्या स्क्रीझोफ्रेनियाच्या रुग्णांनी पाच पट अधिक आत्महेत्येचे प्रयत्न केले होते. तसेच त्यांच्यामध्ये आजीवन आत्महत्येचा प्रभाव 39.2 टक्के तर सामान्य व्यक्तीमध्ये हेच प्रमाण 2.9 टक्के आढळून आले.

एकूण 21,744 कॅनेडियन नागरिकांचा या संशोधनामध्ये अध्ययन करण्यात आले. त्यांपैकी 101 लोक स्क्रीझोफ्रेनियाचे रुग्ण होते. प्राध्यापिका बेली होलिस्टर यांनी माहिती दिली की, ‘या 101 लोकांमध्ये, खासकरून महिला आणि व्यसनाधिन लोकांनी इतरांच्या तुलनेत अधिक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.’

Web Title: Schizophrenia sufferers try more suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.