​पहिल्या फोटोशूटवेळी पाऊण तास रडली होती सानिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 15:39 IST2016-07-13T15:58:24+5:302016-07-14T15:39:24+5:30

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिचे Ace Against Odds हे आत्मचरित्र आलेयं. या आत्मचरित्राच्या निमित्ताने सानियाने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी मीडियाशी शेअर केल्या

Sania was crying for the first photo show! | ​पहिल्या फोटोशूटवेळी पाऊण तास रडली होती सानिया!

​पहिल्या फोटोशूटवेळी पाऊण तास रडली होती सानिया!


/>भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिचे Ace Against Odds  हे आत्मचरित्र   आलेयं. या  आत्मचरित्राच्या निमित्ताने सानियाने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी मीडियाशी शेअर केल्या. टाईम या जगप्रसिद्ध मॅगझीनसाठी सानियाने पहिले फोटोशूट केले. या फोटो शूटआधी मी पाऊण तास माझ्या खोलीत रडत बसले होते. कुणीतरी माझ्या खोलीचे दारही ठोठावले होते. कदाचित दार ठोठावणारे माझे पप्पा वा मम्मी असावेत. मला त्यावेळी टाईम मॅगझीनच्या कव्हरसाठी मुळीच फोटो शूट करायचे नव्हते. मला यात काहीही इंटरेस्ट नव्हता. पण जेव्हा माझा फोटो या मॅगझीनच्या कव्हरवर छापून आला, त्यानंतर मला ही किती मोठी गोष्ट आहे, ते कळले. त्यावेळी माझे वय केवळ १८ वर्षांचे होते. त्या वयात कदाचित मी त्याचे महत्त्व समजू शकले नव्हते, असा एक किस्सा सानियाने सांगितला. हे आत्मचरित्र पूर्ण करायला पाच वर्षे लागतील. ४० भागांच्या या आत्मचरित्रात सानियासंदर्भातील काही वादांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. हार्पर कोलिंसने ते प्रकाशित केले आहे.
 
टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या 'एस अगेन्स्टऑड्स' या आत्मचरित्राचे प्रकाशन अभिनेता शाहरुख खान याच्या हस्ते उद्या होणार आहे. 
सानियाने आपल्या आत्मचरित्रात अनेक घटनांवर प्रकाशझोत टाकला आहे. तसेच तिने आतापर्यंत मिळवलेल्या विजयाचा उल्लेखही त्यात केला आहे. 

Web Title: Sania was crying for the first photo show!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.