​सानियाने लुटला नौकाविहाराचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 07:40 IST2016-03-02T14:40:36+5:302016-03-02T07:40:36+5:30

देशाची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा ही बुधवारी हैदराबादेतील लुंबिनी पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली.

Sania enjoys looting boats | ​सानियाने लुटला नौकाविहाराचा आनंद

​सानियाने लुटला नौकाविहाराचा आनंद

शाची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा ही बुधवारी हैदराबादेतील लुंबिनी पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. लुंबिनी पार्कमधील हुसैन सागर तलावातील दोन नव्या केटारमन नौकांचे उद्घाटन तिच्या हस्ते झाले. यावेळी सानियाने नौकाविहाराचा मनसोक्त आनंद लुटला. सानिया तेलंगण राज्याची ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर आहे. त्यामुळे ती या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिली. या नौका अमेरिकेवरून आणण्यात आल्या आहेत. यावेळी बोलताना सानियाने बालपणीच्या रम्य आठवणींना उजाळा दिला. नावेत बसून तलावाची सैर करणे, यासारखा दुसरा आनंद नाही. मी लहानपणी अनेकदा हा आनंद घेतला आहे. माझ्या नौकाविहाराबाबतच्या अनेक आठवणी आहेत, असे ती यावेळी म्हणाली. शिवाय अधिकाधिक पर्यटकांनी या नौकाविहाराचा आनंद घ्यावा, असे आवाहनही तिने केले.

Web Title: Sania enjoys looting boats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.