सलमानच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत सलीम खान यांनी ट्विटद्वारे मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 15:52 IST2016-06-21T10:22:01+5:302016-06-21T15:52:01+5:30
सलमान खानने ‘बलात्कार‘ बाबत केलेल्या वक्तव्यामुळे सर्वत्र टीकेचा सुर उमटत असताना सलमान खानच्या वक्तव्याबाबत सलीम खान यांनी आज ट्विटद्वारे माफी मागितली

सलमानच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत सलीम खान यांनी ट्विटद्वारे मागितली माफी
स मान खानने ‘बलात्कार‘ बाबत केलेल्या वक्तव्यामुळे सर्वत्र टीकेचा सुर उमटत असताना सलमान खानच्या वक्तव्याबाबत सलीम खान यांनी आज ट्विटद्वारे माफी मागितली. सलमान खान याने सुलतान शूटींगनंतर आपल्याला बलात्कारीत महिलेसारखे वाटल्याचे म्हटले होते. यावर नेटिझन्सनी सलमानवर हल्लाबोल केला होता. प्रसिद्ध लेखक आणि सलमानचे वडिल सलीम खान यांनी याबाबतचे ट्विट केलेयं. त्यांनी म्हटले की, सलमान जे काही बोलला, त्याने जे काही उदाहरण दिले हे चुकीचेच होते. मात्र, यामागचा त्याचा उद्देश वाईट नव्हता.