रसेल वेस्टब्रुकच्या कूल अँड डॅशिंग फ्रेम्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:22 IST2016-01-16T01:07:59+5:302016-02-10T11:22:17+5:30

सूपरस्टार बास्केटबॉल प्लेअर रसेल वेस्टब्रुक त्याच्या ...

Russell Westbrook's Cool & Dashing Frames | रसेल वेस्टब्रुकच्या कूल अँड डॅशिंग फ्रेम्स

रसेल वेस्टब्रुकच्या कूल अँड डॅशिंग फ्रेम्स

परस्टार बास्केटबॉल प्लेअर रसेल वेस्टब्रुक त्याच्या खेळासाठी तर ओळखल्याच जातो परंतु त्याहूनही जास्त तो त्याच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. त्याची सिग्नेचर स्टाईल म्हणजे बोल्ड, डॅशिंग गॉगल फ्रेम्स. लेन्ससहित आणि लेन्सशिवाय असे दोन्ही प्रकारे तो या फ्रेम्स घालतो. त्याची ही स्टाई इतकी फेमस झाली की, त्याने २0१४ साली स्वत:च डिझाईन केलेल्या फ्रेम्सचा 'वेस्टब्रुक फ्रेम्स' नावाने ब्रँड सुरू केला. नुकतेच त्याने 'गोल्ड सिरिज' लाँच केली असून त्यामध्ये प्रत्येक फ्रेम स्टाईलला लॉस एंजिलिसच्या आसपासच्या छोट्या शहरांचे नाव देण्यात आले आहे. तो म्हणतो, 'बास्केटबॉलमुळे मला अनेक ठिकाणी फिरावे लागते. प्रत्येक जागा काही तरी नवीन शिकवून जाते. मला फिरायला खूप आवडते. मी प्रेरणा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या शहरांना भेटी देत असतो. अशाच प्रवासांच्या अनुभवावरून मी या फ्रेम्स डिझाईन केल्या आहेत.'

Web Title: Russell Westbrook's Cool & Dashing Frames

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.