रश्दींच्या ex-wife चे बेधडक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 05:47 IST2016-03-07T12:47:13+5:302016-03-07T05:47:13+5:30
सुप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांची पूर्वाश्रमीची पत्नी पद्मालक्ष्मी हिने लिहिलेले ‘लव्ह, लॉस अॅण्ड वुई एट ’(Love, Loss, and What We Ate) या पुस्तकाने सध्या खळबळ माजली आहे. पद्माच्या या पुस्तकात रश्दींबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे.

रश्दींच्या ex-wife चे बेधडक खुलासे
सुप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांची पूर्वाश्रमीची पत्नी पद्मालक्ष्मी हिने लिहिलेले ‘लव्ह, लॉस अॅण्ड वुई एट ’(Love, Loss, and What We Ate) या पुस्तकाने
सध्या खळबळ माजली आहे. पद्माच्या या पुस्तकात रश्दींबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. पद्माचे हे पुस्तक उद्या ८ मार्चला अमेरिकेत प्रकाशित होत आहे. या पुस्तकात पद्माने स्वआयुष्यातील बरे-वाईट अनुभव, संघर्ष, नातेसंबंध अशा अनेकांवर बेधडकपणे लिहिले आहे. विशेषत: रश्दींबाबत तिने अनेक खळबळजनक दावे व अनुभव शेअर केले आहेत. रश्दींना कायम त्यांची काळजी घेणारे कुणी हवे असते. चांगले खाणे आणि शरिरसुख यांचे ते कायम भुकेले असतात. याबाबतील ते कुणाच्याही भावना समजून घेत नाही. त्यामुळेच त्यांच्यासोबत फिजिकल होणे अनेकदा त्रासदायक होत होते. लग्नानंतर मी एंडोमेट्रायोसिस आजारावर मी उपचार घेत होते. यादरम्यान त्यांनी शरिरसुखाची मागणी केली. मला प्रचंड वेदना होत होत्या. मी नकार दिल्यावर ते नाराज झाले. दुसºयादिवशी ते दौºयावर गेले आणि मी माझ्या वकीलाकडे. त्याचक्षणी मी लग्न संपवण्याचा निर्णय घेऊन चुकले होते, असा एक अतिशय खासगी किस्सा पद्माने पुस्तकात लिहिला आहे. १९९८ मध्ये मी रश्दींना भेटले. तेव्ही मी २८ वर्षांचे होते. मॉडेलिंग आणि अॅक्टिंगसाठी स्ट्रगल करीत होते. रश्दी ५१ वर्षांचे होते. लॉस एंजिलिसमध्ये असताना रश्दींनी मला पहिल्यांदा फोन केला. पहिल्या डेटमध्ये ते मला बेडरूममध्ये घेऊन गेले. २००४ मध्ये आमचे लग्न झाले. रोज सकाळी ते माझ्यासाठी ब्रेकफास्ट आणायचे, अशी एक आठवणही तिने लिहिली आहे. पद्मालक्ष्मी ही रश्दींची तिसरी पत्नी होती. २००७ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता.