रोल्स रॉयसचे बॉलिवूडशी खास नाते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:01 IST2016-01-16T01:14:32+5:302016-02-06T12:01:20+5:30
स्वप्न वास्तवात रोल्स रॉयस ही अतिशय महागडी आणि स्टेटस सिंबाल असलेली कार आहे. विशिष्ट वर्गासाठीची कार म्हणून ती ओळखली जाते. राजे महाराजांची तर ती खास ओळख आहे. अनेक बॉलिवूड स्टार या कारचे स्वप्न बघत असतात. काहींनी तर हे स्वप्न वास्तवातही उतरवले आहे.

रोल्स रॉयसचे बॉलिवूडशी खास नाते
र ल्स रॉयस ही अतिशय महागडी आणि स्टेटस सिंबाल असलेली कार आहे. विशिष्ट वर्गासाठीची कार म्हणून ती ओळखली जाते. राजे महाराजांची तर ती खास ओळख आहे. अनेक बॉलिवूड स्टार या कारचे स्वप्न बघत असतात. काहींनी तर हे स्वप्न वास्तवातही उतरवले आहे.
प्रियंका चोप्रा हिने २0१३ मध्ये ही कार घेतली. या कारची किंमत आहे दोन कोटी. पैसा असला की हौस भागवता येते. विधू विनोद चोप्राने २00७ मध्ये अमिताभला एकलव्य मधील भूमिकेवर खूश होऊन रॉली रॉयस फँटम ही कार भेट दिली. ही कार भेट देणे म्हणजे आवडत्या मित्रावरचे प्रेम व्यक्त करणेच होय. रोल्स रॉयस या कंपनीने २0१४ मध्ये केवळ ४000 कार बनवल्या. वर्षभरात या सर्व कार विकल्या गेल्या. आधीच्या तुलनेत हा आकडा फार मोठा आहे. संजय दत्त हासुद्धा कारचा चांगलाच शौकीन आहे. त्याच्याकडे रोल्स रॉयस फँटम ही कार आहे. खरं तर त्याने ही कार त्याची पत्नी मान्यता हिला भेट दिली आहे. आमीर खानकडे रोल्स रॉयस ही कार आहे. तो काही खास वेळीच तिचा वापर करतो. तिची किंमत ३.११ कोटी आहे. शाहरुख खानकडेही कारचा चांगला संग्रह आहे. ऑडी आणि बेंटलेशिवाय त्याच्याकडे अर्थात रोल्स रॉयस आहेच. मल्लिका शेरावतला रोल्स रॉयस घ्यायची होती. बघू तिचे स्वप्न केव्हा पूर्ण होते ते! दक्षिणेतील अभिनेता विजय आणि चिरंजिवी यांच्याकडेही ही कार आहे. याचा अर्थ एवढाच की बॉलिवूडच नव्हे तर दक्षिणेतील कलावंतांमध्येही या कारचे फॅड आहे.