रॉकची सरप्राइज व्हिजिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 03:19 IST2016-03-16T10:19:27+5:302016-03-16T03:19:27+5:30
डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार व अभिनेता द रॉकने (ड्वेन जॉनसन) जॉर्जिया येथील एका हॉस्पिटलमध्ये सरप्राइज व्हिजिट देत संगळ्यांनाच चकीत केले.

रॉकची सरप्राइज व्हिजिट
ड ्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार व अभिनेता द रॉकने (ड्वेन जॉनसन) जॉर्जिया येथील एका हॉस्पिटलमध्ये सरप्राइज व्हिजिट देत संगळ्यांनाच चकीत केले. जेव्हा तो लहान मुलांच्या वार्डात पोहचला तेंव्हा संगळ्यांच्याच नजरा त्याच्याकडे होत्या. काही क्षणातच मुलांनी त्याला गराडा घातला. यावेळी रॉकने मुलांसोबत केलेल्या धमालचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. सध्या रॉक ‘बेवॉच’ चित्रपटाची शुटिंग करत असून हॉस्पिटलमध्ये काही सीन शुट करण्यात येणार असल्याने तो त्याठिकाणी पोहचला होता. यावेळी इंस्टाग्रामवर शेअर केलेला एडन नावाच्या मुलासोबतचा फोटो चांगलाच गाजत आहे. या व्हिजीटबाबत रॉक म्हणतो की, आजचा अनुभव माझ्यासाठी स्पेशल होता. या व्हिजिटच्या नियोजनाबाबत मी माझ्या सर्व टिमचे आभार मानतो, असेही त्याने सांगितले.