द रॉक बनला प्रोड्युसर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 19:08 IST2016-05-06T13:38:45+5:302016-05-06T19:08:45+5:30
रेसलर ते अभिनेता असा प्रवास असलेल्या डी. जॉनसन ऊर्फ द रॉक सध्या ‘बेवॉच’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सुत्रानुसार तो लवकरच ‘जुमांजी रीबूट’ या चित्रपटाला प्रोड्यूस करणार आहे.

द रॉक बनला प्रोड्युसर
र सलर ते अभिनेता असा प्रवास असलेल्या डी. जॉनसन ऊर्फ द रॉक सध्या ‘बेवॉच’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सुत्रानुसार तो लवकरच ‘जुमांजी रीबूट’ या चित्रपटाला प्रोड्यूस करणार आहे. तर जॅक कस्डान या चित्रपटाला डायरेक्ट करणार आहे. स्क्रिप्टचे मुख्य लेखक क्रिस मॅकेन्न आणि एरिक सोमर्सच्या कथेला स्कॉट रोजनबर्ग आणि जॅक पिंकर नव्या रंगात सादर करणार आहेत. रॉकने इंस्टाग्रामवर याबाबतची पोस्ट टाकली असून, चित्रपटाची शुटिंग याच वर्षी सुरू होणार आहे. २८ जुलै २०१७ मध्ये चित्रपट रिलीज केला जाईल. याबाबत रॉकने सांगितले की, चित्रपटात दाखविण्यात आलेला खेळ असा आहे की, बहुतेक लोकांनी तो खेळला आहे. त्यामुळे आम्ही लवकरच हा खेळ प्रेक्षकांसाठी वेगळ्या पद्धतीने सादर करणार आहे. सध्या जुमांजी चित्रपटाचा शेवट कसा करावा यावर काम सुरू असून, संपुर्ण यासाठी मेहनतीने काम करीत असल्याचे सांगितले.