रोचोला वडिलांसोबत राहयचेय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 23:42 IST2016-01-16T01:06:14+5:302016-02-11T23:42:23+5:30
गायिका मॅडोना हिचा मुलगा रोचो याने आईविरोधात तक्रार केली असून, ती आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त कंट्...

रोचोला वडिलांसोबत राहयचेय!
ग यिका मॅडोना हिचा मुलगा रोचो याने आईविरोधात तक्रार केली असून, ती आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त कंट्रोल करीत असल्याने मला वडिलांसोबत राहायचे आहे, असे म्हटले आहे. चित्रपट दिग्दर्शक असलेल्या रिचे यांचा मुलगा सध्या आपल्या आईसोबत राहत आहे. मुलाचा ताबा नेमका कोणाकडे राहाणार याबाबत सध्या मॅडोना आणि रिचेमध्ये न्यायालयात केस सुरू आहे. मॅडोनाने आपल्यासोबत रॅचोला एका टूरला नेले होते. मात्र, त्यात ती केवळ आपल्या मुलीसोबत मजामस्ती करीत होती. माझ्याकडे लक्षही देत नव्हती, तसेच माझ्यावर प्रमाणापेक्षा जास्त नियंत्रण ठेवत होती. त्यामुळे आपण नाराज झालो, असे रोचोने म्हटले आहे. तसेच रॅचोने आपल्या वडिलांना मेसेज करून मला येथून घेऊन जा, असेही म्हटल्याचे समजते. मॅडोना मुलगी लाऊर्डस हिच्यासोबत अधिक वेळ घालविते. माझ्याकडे दुर्लक्ष करते. तिने आपल्या मुलीसोबतचे छायाचित्रही सोशल मीडियावर शेअर केले आहे.