रीताने केले अफवांचे खंडन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 20:45 IST2016-04-28T15:15:46+5:302016-04-28T20:45:46+5:30
गायिका-अभिनेत्री रीता ओराने अफवांचे खंडन करताना सांगितले की, ती रॅपर जे-जेडसोबत डेटिंग करीत नाही. जे-जेड गायिका बियॉन्से नॉलेस हिचा पती आहे.

रीताने केले अफवांचे खंडन
ग यिका-अभिनेत्री रीता ओराने अफवांचे खंडन करताना सांगितले की, ती रॅपर जे-जेडसोबत डेटिंग करीत नाही. जे-जेड गायिका बियॉन्से नॉलेस हिचा पती आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रीता आणि जे-जेडमध्ये अफेअर सुरू असल्याच्या अफवा पसरविल्या होत्या. अखेर रीताने ट्विट करून यासर्व अफवांचे खंडन केले. दरम्यान याअगोदर एक फोटो लिक करण्यात आला होता, ज्यात रीता बियॉन्से नॉलेसप्रमाणेच आउटफिटमध्ये बघावयास मिळत होती. नुकत्याच रिलिज झालेल्या अल्बम ‘लेमनेड’च्या कार्यक्रमादरम्यान तिने हा ड्रेस परिधान केला होता. रिताने ट्विट करताना अफवा चुकीच्या असून, आमच्यात अशाप्रकारचे कुठलेच संबंध नाहीत. मी बियॉन्सेचा आदर करीत असल्याचेही तिने स्पष्ट केले.