रितेश देशमुखचा जलयुक्त लातूरसाठी निधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 17:28 IST2016-04-23T11:58:02+5:302016-04-23T17:28:02+5:30
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणाºया कलाकारांच्या यादीत आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे. कौतुकास्पद बाब म्हणजे बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने हे पाऊल उचलले आहे
.jpg)
रितेश देशमुखचा जलयुक्त लातूरसाठी निधी
द ष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणाºया कलाकारांच्या यादीत आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे. कौतुकास्पद बाब म्हणजे बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने हे पाऊल उचलले आहे. रितेशने जलयुक्त लातूरसाठी २५ लाखांचा निधी दिला आहे.
राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी अभिनेता आमिर खान आणि लेखक-दिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी पुढाकार घेतला आहे. त्या दृष्टीने ‘पाणी फाउंडेशन’ मार्फत राज्यभरातील गावागावात जाऊन जलसंधारणाची कामं करण्यात येत आहेत. पाणी फाउंडेशनने सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेचे आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाशी सचिन तेंडुलकर आणि रतन टाटा यासारख्यांचाही सहभाग आहे.