रिहानाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:19 IST2016-01-16T01:15:55+5:302016-02-06T10:19:44+5:30

 रिहानाचा विरोध न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथे आयोजित रिहानाच्या परफ्यूम ...

Rihanna opposes | रिहानाचा विरोध

रिहानाचा विरोध

 
िहानाचा विरोध

न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथे आयोजित रिहानाच्या परफ्यूम रिलीज कार्यक्रमात काही व्यक्तींनी अचानक गोंधळ घातल्याने रिहानाला चांगलाच धक्का बसला. रिहाना जेव्हा जनावरांच्या कातड्यापासून बनविलेले कपडे परिधान करून स्टेजवर आली, तेव्हा काही व्यक्ती घोषणाबाजी देत स्टेजपर्यंत पोहचले. त्यामुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुरक्षा रक्षकांनी वेळीच धाव घेत आंदोलनकर्त्यांना बाहेर काढले. यापूर्वी देखील कातड्यांपासून बनविलेले कपडे परिधान केल्याने रिहाना वादात सापडली होती.

केलीने टोचले कान

रिअँलिटी टीव्ही स्टार जेनर हिने कान टोचले असून, याचे काही फोटोज् तिने मोबाईल अँप्लिकेशनवर शेअर केले आहेत. 'एसशोबिज डॉट को डॉट युके' या वेबसाईटवर केलीने कानात सोन्यांचे दागिने घातलेले काही फोटो शेअर केले आहेत. तसेच तिच्या कानाच्या बाजूचा भाग लाल आणि सुजलेला असल्याचेही दिसत असल्याने तिने कान टोचल्याचे स्पष्ट होत आहे.

ल्यूकची प्रकृती स्थिर

हैलोवीन पोशाखमध्ये आग लागल्याने जखमी झालेला अभिनेता जीन ल्यूक बिलोडी याची प्रकृती आता स्थिर आहे.
गेल्या आठवड्यात सह अभिनेता तहज मौर्य याच्या हैलोवीन पार्टीत अचानक आग लागल्याने ल्यूक गंभीर जखमी झाला होता.
त्याच्या हात आणि पायाला जखमा झाल्याने तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.
ही बातमी वार्‍यासारखी पसरल्याने त्याच्या फॅन्समध्ये चिंता व्यक्त केली जात होती.

Web Title: Rihanna opposes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.