द रेवेनंटचा अभिनेता जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 20:37 IST2016-03-31T03:37:53+5:302016-03-30T20:37:53+5:30
‘द रेवेनंट’ या चित्रपटातील अभिनेता ब्रेंडन फ्लेचरच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. कॅनडात टीव्ही मालिकेच्या शूटिंग दरम्यान बंदूकीच्या गोळीने तो जखमी झाला होता.

द रेवेनंटचा अभिनेता जखमी
द रेवेनंट’ या चित्रपटातील अभिनेता ब्रेंडन फ्लेचरच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. कॅनडात टीव्ही मालिकेच्या शूटिंग दरम्यान बंदूकीच्या गोळीने तो जखमी झाला होता. सुत्रानुसार ‘कार्डिनल’ या मालिकेच्या शुटिंग दरम्यान त्याच्या गळ्याला गंभीर जखम झाली होते. त्यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्याची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्याला आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. द रेवेनंट या चित्रपटात लियोनाडरे डिकैप्रियो फ्लेचरची महत्त्वाची भूमिका आहे.