‘या’ एका चुकीमुळे विजय माल्या लागला देशोधडीला, जाणून घ्या संपूर्ण सत्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 15:08 IST2017-04-19T09:38:14+5:302017-04-19T15:08:14+5:30

एका वेळेस ‘किंग आॅफ गुड टाइम’ म्हटला जाणारा विजय माल्यावर सध्याची ही वाईट वेळ फक्त एका चुकीमुळे आली आहे

'This' resulted in the victory of a widow, Deshoddhadi, know the whole truth! | ‘या’ एका चुकीमुळे विजय माल्या लागला देशोधडीला, जाणून घ्या संपूर्ण सत्य !

‘या’ एका चुकीमुळे विजय माल्या लागला देशोधडीला, जाणून घ्या संपूर्ण सत्य !

ong>-Ravindra More
स्टेट बँक आॅफ इंडियासह देशातील अनेक बँकांचे कर्ज थकवून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या उद्योगपती विजय माल्याला मंगळवारी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. मात्र अटकेनंतर काही तासांतच विजय माल्या जामिनावर मुक्त झाला.  
एका वेळेस ‘किंग आॅफ गुड टाइम’ म्हटला जाणारा विजय माल्यावर सध्याची ही वाईट वेळ फक्त एका चुकीमुळे आली आहे. आज आम्ही आपणास ती चुकी सांगणार आहोत ज्यामुळे त्याला अटक करण्याची वेळ आली.

* माल्यावर किती कर्ज आहे?
माल्यावर बॅँकांचे सुमारे ९ हजार करोड रुपये कर्ज आहे. कर्ज वसुलीसाठी नुकताच त्याचा ‘किंगफिशर व्हिला’ची विक्री देखील झाली. 
कर्जाची परतफेड न क रण्यासाठी माल्या म्हटला होता की, तेला भाव वाढणे, जास्तीचा टॅक्स आणि खराब इंजीनच्या कारणाने त्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला ६ हजार १०७ करोड रुपयाचा तोटा सहन करावा लागला होता.        

Kingfisher

* २००५ मध्ये सुरु झाली होती किंगफिशर            
प्रीमियम सेवांसाठी ओळख असलेली किंंगफिशरची स्थापना २००३ मध्ये करण्यात आली होती.  २००५ मध्ये कमर्शियल आॅपरेशन सुरु करण्यात आले. काही कालावधीतच किंगफिशन एवियशन सेक्टरची मोठी कंपनी म्हणून उदयास आली. या दरम्यान देण्यात येणाºया प्रीमियम सेवा इतर कंपन्यांच्या तुलनेने खूपच हाय क्लास होत्या. यासाठी कंपनीला मोठा खर्च करावा लागत होता, मात्र कॉस्ट काढणे कंपनीला अवघड जात होते. अशातच कंपनीने देशातली एक लो कॉस्ट एवियशन कंपनी खरेदी करण्याचा प्रयत्न सुरु केला. २००७ मध्ये हा प्रयत्न यशस्वीदेखील झाला मात्र या प्रयत्नातूनच त्याचा आयुष्यातल्या त्या चुकीकडे प्रवास सुुरु झाला. 

* माल्याने २००७ मध्ये खरेदी केली एयर डेक्कन
माल्याने २००७ मध्ये देशातली पहिली लो कॉस्ट एवियशन कंपनी एयर डेक्कनचे अधिग्रहण केले होते. त्यासाठी ३० करोड डॉलर एवढी रक्कम खर्च करण्यात आली होती, जी त्यावेळची १२०० करोड रुपये होती. या सौद्यात माल्याला तात्काळ फायदाही झाला होता आणि किंगफिशर देशातली मोठी दोन नंबरची कंपनी बनली. मात्र एयर डेक्कन खरेदी करण्याचे उद्दिष्टे यशस्वी नाही झाले. 

* अशा प्रकारे फेल झाली माल्याची स्ट्रॅटडी
माल्या एयर डेक्कन खरेदी करण्यात जरी यशस्वी झाला, मात्र यामुळे त्याची किंगफिशरला मजबूती देण्याची स्ट्रॅटजी वाईट पद्धतीने फेल झाली. नंतर माल्याने दोन्ही एअरलाइन्सचे एकत्रिकरण केले आणि एयर डेक्कनचे नाव बदलून किंगफिशर रेड ठेवले, जी प्रीमियम सेवांबरोबरच लो कॉस्ट सेवादेखील देऊ लागली. याप्रकारे कंपनी एकाच ब्रॅँड किंगफिशरच्या नावाने दोन्ही सेवा प्रदान करु लागली. भारतात लो कॉस्ट एवियशन मॉडलला आणणारे आणि एयर डेक्कनचे संस्थापक कॅप्टन गोपीनाथ यांंनी एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले होते की, माल्याचा हा निर्णय संभाव्यस्थितीत चांगला होता, मात्र त्याला सर्व घरगुती सेवांना लो कॉस्ट आणि आंतरराष्ट्रीय सेवांना प्रीमियम ठेवायला हवे होते. गोपीनाथच्या मते, एक ब्रँडच्या दोन्ही सेवांमध्ये जास्त फरक नव्हता, आणि तेथूनच समस्या निर्माण होऊ लागल्या.  

* अखेर किंगफिशर बंद झाली...
गोपीनाथ यांच्या मते, माल्याने अजून एक चुकीचा निर्णय घेतला होता. त्यांनी म्हटले की, ‘माल्याने एयर डेक्कन सोबत दत्तक घेतलेल्या मुलासारखा व्यवहार केला. एकत्रिकरणानंतर माल्याला अपेक्षा होती की एयर डेक्कनचे कस्टमर किंगफिशरकडे वळतील. मात्र याचे उलटे होऊ लागले. एयर डेक्कनचे (किंगफिशर रेड) कस्टमर अन्य लो कॉस्ट एयरलाइन्सकडे वळू लागले. याप्रमाणे आॅक्टोबर २०१२ मध्ये किंगफिशर एयरलाइन्स बंद झाली. 

Also Read : कोण आहे विजय माल्याचा व्हिला विकत घेणारा सचिन जोशी, जाणून घेऊया !
 

Web Title: 'This' resulted in the victory of a widow, Deshoddhadi, know the whole truth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.