Research : का आणि केव्हा धोका देतात महिला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 12:38 IST2017-04-20T07:08:14+5:302017-04-20T12:38:14+5:30
आपल्या पार्टनरविषयीदेखील आपल्या मनात शंका व्यक्त होत आहे का? सविस्तर जाणून घेण्यासाठी वाचा हि बातमी...
.jpg)
Research : का आणि केव्हा धोका देतात महिला !
नुकताच संशोधकांनी केलेल्या एका संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की, ज्या महिला विशेषत: आॅर्गेजम फील करण्याची गोष्ट स्वीकारतात, त्यांच्याद्वारे आपल्या पार्टनरला फसविण्याची शक्यता सर्वात जास्त असते. संशोधनात असेही आढळले आहे की, फेक आॅर्गेजम विषयी बोलणाऱ्या महिलेचे आपल्या पार्टनरशी संबंध व्यवस्थित नसतात. सोबतच असेदेखील संशोधनात म्हटले आहे की, सुखी व आनंदी सेक्शुअल रिलेशनसाठी चांगले भावनात्मक संबंध आवश्यक आहेत.
करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात महिलांना प्रामुख्याने हा प्रश्न विचारण्यात आला की, त्या सरासरी कितीवेळा आॅर्गेजम फील करतात. तर पुरुषांसाठी मुख्य प्रश्न हा होता की, त्यांना असे कितीवेळा वाटते की, त्यांची पार्टनर आॅर्गेजमपर्यंत पोहोचली आहे.
मात्र संशोधकांनी दावा केला आहे की, ज्या महिलांना आॅर्गेजम कधीकधी फील होतो, त्यांच्याद्वारे आपल्या पार्टनरला फसवण्याची शक्यता नसल्यासारखी असते. पण जास्त आॅर्गेजम विषयी बोलणारी महिला या श्रेणीत उच्च स्थानावर असते.
संशोधनानुसार, ज्या महिला कधीकधी आॅर्गेजम फील करते, त्यांच्या संतुष्टीचे कारण म्हणजे त्यांच्या पार्टनरचे त्यांच्याशी असलेले चांगले संबंध होय. संशोधनात असेही म्हटले आहे की, महिलांनी विश्वासात राहावे की नाही यासाठी पुरुषांचे तिच्याशी असलेले व्यवहार जबाबदार असतात. संशोधनात, महिला आणि पुरुषांना असादेखील प्रश्न विचारण्यात आला की, आपण कधी आपल्या पार्टनरचा विश्वासघात केला आहे? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिश्र स्वरुपात मिळाले.