घरामध्येच आॅफिस करताय मग या 9 गोष्टी लक्षात ठेवा!
By Admin | Updated: May 5, 2017 17:00 IST2017-05-05T17:00:37+5:302017-05-05T17:00:37+5:30
प्रत्येक घरात छोटेखानी आॅफिस ही आता काळाची आणि बदलत्या कामाच्या शैलीची गरज बनली आहे. तुमच्या घरातही आहे का आॅफिस असेच? मग त्या आॅफिसच्या सजावटीसाठी काही केलंय तुम्ही?

घरामध्येच आॅफिस करताय मग या 9 गोष्टी लक्षात ठेवा!
- सारिका पूरकर-गुजराथी
असं म्हणतात की आॅफिसचं काम घरी आणू नये. परंतु, आता दिवसाचे १८-२० तास कामाचे झालेत. त्यामुळे साहजिकच घरीच आॅफिस असणं आवश्यक आणि सोयिस्कर झालं आहे. कारण घरातल्या आॅफिसमुळे महत्वाची कामं घरबसल्या होऊ लागली आहेत, शिवाय महिलांसाठी तर वर्क फ्रॉम होम अर्थात घरी बसून काम ही संकल्पनाही लाभदायी ठरु लागली आहे. थोडक्यात प्रत्येक घरात छोटेखानी आॅफिस ही आता काळाची आणि बदलत्या कामाच्या शैलीची गरज बनली आहे. तुमच्या घरातही आहे का आॅफिस असेच? मग त्या आॅफिसच्या सजावटीसाठी काही केलंय तुम्ही? आता आॅफिसच ते.. ते काय सजवायचं? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो पण सजावटीची गरज आॅफिसलाही असते. स्वच्छ, नीट नेटक आणि आकर्षक आॅफिस असेल तर काम करायला उत्साह येतोच शिवाय कामासाठी म्हणून आलेल्यांनाही आपल्या आॅफिसकडे पाहून प्रसन्न वाटतं.