नाते असावे पारदर्शक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2016 20:40 IST2016-05-20T15:10:32+5:302016-05-20T20:40:32+5:30

​ लग्नासाठी आपण ज्या जोडीदाराची निवड केली आहे. त्याला लग्नापूर्वीच तुमच्या आयुष्यासंबंधी सर्व गोष्टी सांगणे आवश्यक आहे. यामुळे नातेसंबंधामध्ये पारदर्शकता बाळगता येते आणि नंतर भांडणाचे प्रसंग येत नाहीत. सर्व गोष्टी मनमोकळ्या बोलल्याने भांडणही टळते.

Relationships should be transparent | नाते असावे पारदर्शक

नाते असावे पारदर्शक


/>
सर्व अपेक्षा स्पष्ट  सांगा : आपल्याला आपल्या जोडीदारासोबत जीवन जगावयाचे असेल तर त्याला सर्व माहिती द्यावी. आपल्याला या नात्यापासून काय अपेक्षा आहेत. आपण जर काही गोष्टी लपविण्याचा प्रयत्न केला तर दोघांचे नाते चांगले राहत नाहीत. 
प्लॅन शेअर करावे : आपल्या होणाºया जीवनसाथीदाराला करिअर प्लॅन, प्रोफेशनल गोल्स व जीवनात आपल्याला प्रगती करण्यासाठी काय करता येईल, याची माहिती द्यावी. 

स्वत :विषयी माहिती द्यावी : जोडीराला आपल्या सर्व गोष्टीची माहिती द्यावी. त्याचबरोबर मी स्वत: विषयी काय विचार करते, याचीही माहिती सांगावी. अशा गोष्टी एकमेकांना बोलल्याने दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ शकतात. जोडीदाराचे आपल्यावरील  प्रेम अशा गोष्टीमुळे आणखी वाढते.

कुटुंबाविषयी मोकळेपणे बोलावे : प्रत्येक कुटुंबामध्ये छोटे किंवा मोठे वाद असतातच. या वादाची सर्व माहिती ही आपल्या साथीदाराला आवश्य सांगावी. ही माहिती त्याला मिळाल्याने तो  सुद्धा आपल्या कुटुंबाचा  भाग बनतो. यामुळे नातेसंबंध हे अजून मजबूत होतात. 
विचार : आपले व त्याचे मित्र तसेच कुटुंब व सहकाºयांविषयी आपले विचार कसे आहेत. हे प्रामणीकपणे साथीदारासोबत शेअर करावे. आपल्याला  एखाद्या व्यक्ती आवडत नसेल तर ते सुद्धा मोकळेपणे बोलून दाखवावे.
भूतकाळातील प्रेमाची माहिती द्या : पूर्वीच्या एखाद्या रिलेशनशिपमध्ये आपण होता. त्यावेळची  आठवण म्हणून आजही ती आपल्या जवळ आहे. याविषयी आपण कुणाजवळही बोलू शकत नाही. परंतु, आपल्या साथीदाराला त्याची आवश्य माहिती द्यावी. कारण की, नंतरला  ही गोष्ट त्याला माहित झाली तर त्याचे त्याला  खूप वाईट वाटू शकते. 

Web Title: Relationships should be transparent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.