​विराटचा आवाज असलेल्या गाण्याचं रेकॉर्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 19:53 IST2016-06-08T14:23:30+5:302016-06-08T19:53:30+5:30

भारताचे महान संगीतकार ए.आर.रहमान यांनी संगीतबद्ध केलेले गाणं गाण्याची सुवर्ण संधी भारताचा कसोटी क्रिकेट कर्णधार विराट कोहलीच्या वाट्याला चालून आली आहे.

Recording of Virat voice | ​विराटचा आवाज असलेल्या गाण्याचं रेकॉर्डिंग

​विराटचा आवाज असलेल्या गाण्याचं रेकॉर्डिंग

रताचे महान संगीतकार ए.आर.रहमान यांनी संगीतबद्ध केलेले गाणं गाण्याची सुवर्ण  संधी भारताचा कसोटी क्रिकेट कर्णधार विराट कोहलीच्या वाट्याला चालून आली आहे. 

इंडियन मोझार्ट अशी ज्याची ख्याती आहे, असा महान संगीतकार म्हणजे ए. आर. रहमान. रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं गाण्याची अनेक मोठमोठ्या गायकांची इच्छा असते. मात्र ही संधी भारताचा कसोटी क्रिकेट कर्णधार विराट कोहलीच्या पदरी पडली आहे. ‘नाम है फुत्सल..’ असे गाण्याचे बोल असून त्याचा म्युझिक व्हिडिओ येत्या दोन आठवड्यात लाँच होणार आहे. आठवड्याभरापासून या गाण्यावर काम सुरु असून विराटला यात रॅप पार्ट दिल्याचं रहमान यांनी सांगितलं. गाण्याचे बोल इंग्रजीत असून विराटला सोपं जावं म्हणून रॅपसह वेगळ्या पद्धतीचं मिक्सिंग केल्याचंही ते सांगतात. 

विराटने मात्र ए. आर. रहमान यांच्यासोबत काम करताना नर्व्हस असल्याचं म्हटलं आहे. माज्या बालपणीच्या अनेक आठवणी या व्यक्तीशी निगडीत आहेत. क्रिकेटची तयारी कशी करायची, हे मला माहित आहे, मात्र गाण्याचा अनुभव माज्यासाठी नवीन आहे.

Web Title: Recording of Virat voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.