दारू न सुटण्याचे कारण - जनुके

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:24 IST2016-01-16T01:12:24+5:302016-02-08T04:24:55+5:30

आपल्या अवतीभवती एखादी तरी असा व्यक्ती असते ज्याची काही केल्या दारू सुटत नाही. अशा दारूच्या व्यसनामा...

The reason for not dropping alcohol - genetics | दारू न सुटण्याचे कारण - जनुके

दारू न सुटण्याचे कारण - जनुके

ल्या अवतीभवती एखादी तरी असा व्यक्ती असते ज्याची काही केल्या दारू सुटत नाही. अशा दारूच्या व्यसनामागे काय कारण असू शकते याचा शोध घेतला असता असे दिसून आले की याला जनुकीय कारण असू शकते. 'ट्रान्सलेशनल सायकियाट्री'मध्ये प्रकाशित रिसर्चनुसार काही जेनेटिक कारणांमुळे दारूचे व्यसन सुटणे अवघड होऊन बसते.

हेलसिंकी विद्यापीठातील संशोधकांनी हे अध्ययन केले आहे. सेरोटोनिन २-बी रिसेप्टरमध्ये असणार्‍या जनुकांमुळे दारू पिण्याची ओढ कमी होत नाही. अद्याप वैज्ञानिकांना या रेसेप्टरबद्दल फारशी माहिती नाही; परंतु मानसिक रुग्णांप्रमाणे आपल्या वर्तनाशी त्याचा संबंध असू शकतो.

अध्ययनाचे प्रमुख रूप टिकानेन यांच्या मते, रिसेप्टरमध्ये होणार्‍या फेरफारीमुळे दारू पिल्यानंतर व्यक्तीचा स्वभाव अधिक निग्रही आणि हट्टी होतो.त्यामुळे ज्या लोकांमध्ये अशा प्रकारची फेरफार होते त्यांचे स्वनियंत्रण प्रभावी नसते. प्रलोभनापासून दूर राहणे त्यांना जमत नाही.

Web Title: The reason for not dropping alcohol - genetics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.