​रिअ‍ॅलिटी शो आधी ठरलेले नसतात- सनी लिओनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 18:22 IST2016-06-05T12:52:42+5:302016-06-05T18:22:42+5:30

बऱ्याच प्रेक्षकांना असे वाटते की टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शो हे आधीपासून ठरवून म्हणजेच स्क्रीप्टेड असतात

Reality shows are not before - Sunny Leone | ​रिअ‍ॅलिटी शो आधी ठरलेले नसतात- सनी लिओनी

​रिअ‍ॅलिटी शो आधी ठरलेले नसतात- सनी लिओनी

्याच प्रेक्षकांना असे वाटते की टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शो हे आधीपासून ठरवून म्हणजेच स्क्रीप्टेड असतात, मात्र अशी वस्तुस्थिती नसून उलट काही प्रसंग असे घडतात की त्यामुळे माध्यमांच्या हेडलाइन्स बनतात, आणि ते आमच्यासाठीदेखील अचानक समोर येणारे आणि धक्का देणारे प्रसंग असतात. हे म्हणणे आहे ‘बिग बॉस’ आणि ‘स्प्लिट्झव्हिला’ या रिअ‍ॅलिटी शो मध्ये भाग घेणारी सनी लिओनी हिचे. 

सनी पुढे सांगते की, ‘अशा कार्यक्रमांतून काही मसालेदार क्षण समोर येतात जे प्रेक्षकांप्रमाणेच आम्हा कलाकारांसाठीसुद्धा दिग्मूढ करणारे असतात. मला स्वत:ला रिअ‍ॅलिटी शो आवडतात. बºयाच लोकांना वाटते की हे शो कोणीतरी ठरवल्याप्रमाणे चालविले जातात. पण खरं तर अशा शोमध्ये कधी कधी असे काही प्रक्षोभक प्रसंग उद्भवतात की ज्यांची पूर्वकल्पना आम्हा कलाकारांनादेखील नसते. कोणत्या कलाकाराला शो मध्ये ठेवायचे आणि कोणत्या कलाकाराला शो बाहेरची वाट दाखवायची हे प्रेक्षक ठरवत असतात, दुसरे कोणी नव्हे.  प्रेक्षक जशी निवड करतील तशी शो ची प्रगती ठरत असते.

एमटीव्हीच्या ‘स्प्लिट्झव्हिला’ या रिअ‍ॅलिटी शोच्या नवव्या आवृत्तीची होस्ट म्हणून सनी ११ जुलै पासून आपल्याला पुन्हा दिसणार आहे. ‘स्त्रियांची हुकूमत’ ही थीम असलेल्या या कार्यक्रमात सहा तरुणी राजकन्यांच्या भूमिकेत तर त्यांची हृदये जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या योद्ध्यांच्या भूमिकेत नऊ तरुण असणार आहेत.  रागिणी एमएमएस-२ या चित्रपटात झळकलेल्या सनीची एखाद्या रिअ‍ॅलिटी शोचे होस्टपद भूषविण्याची ही तिसरी वेळ आहे. अमेरिकन डेटिंग रिअ‍ॅलिटी मालिका ‘फ्लेवर आॅफ लव्ह’ यावर आधारित एमटीव्ही ‘स्प्लिट्झव्हिला’-९ येत्या ११ जून पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  

Web Title: Reality shows are not before - Sunny Leone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.