रवीन्द्र जडेजाचे १७ ला शुभमंगलम् सासºयाने भेट दिली १ कोटींची आॅडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 19:01 IST2016-04-06T02:01:30+5:302016-04-05T19:01:30+5:30
भारतीय क्रिकेट संघातील आॅलराऊंडर रवींद्र जडेजा येत्या १७ एप्रिलला बोहल्यावर चढणार आहे.तत्पूर्वीच रिवाबाचे वडील हरदेव सिंह यांनी आपल्या लाडक्या जावयाला १ कोटी रूपयांची आॅडी क्यू745 ही अलीशान गाडी भेट दिली.

रवीन्द्र जडेजाचे १७ ला शुभमंगलम् सासºयाने भेट दिली १ कोटींची आॅडी
भ रतीय क्रिकेट संघातील आॅलराऊंडर रवींद्र जडेजा येत्या १७ एप्रिलला बोहल्यावर चढणार आहे. मंगेतर रीवाबा हिच्यासोबत रवींद्र सात फेरे घेणार आहे. तत्पूर्वीच रिवाबाचे वडील हरदेव सिंह यांनी आपल्या लाडक्या जावयाला १ कोटी रूपयांची आॅडी क्यू745 ही अलीशान गाडी भेट दिली. कारची डिलीवरी घेण्यासाठी सोमवारी रवींद्र व रिवाबा दोघेही शोरूममध्ये पोहोचले आणि मग आॅडीने फिरायला निघाले. साहजिकच सासºयाकडून एवढे मोठे गिफ्ट मिळाल्यानंतर रवींद्र जाम खूश आहे. पत्रकारांनी याबाबत त्याला विचारल्यावर, असे सासरे सगळ्यांना मिळो, अशा शब्दांत आनंद व्यक्त केला. आत्तापर्यंत मी ए-फोर मॉडल आॅडी चालवायचो. आता हे नवे मॉडेल खरेदी करण्याची योजना होतीच पण तत्पूर्वीच सासरेबुवांनी मला ते गिफ्ट दिले, असेही तो म्हणाला.