​विशेष मुलांसोबत रमली 'लालबागची राणी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 19:16 IST2016-05-22T13:46:01+5:302016-05-22T19:16:01+5:30

समाजात गतिमंद समजल्या जाणाऱ्या या विशेष मुलांचे वेगळे जग असते. त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन हा सामान्यांपेक्षा वेगळा असतो.

Ramli 'Queen of Lalbagh' with special children | ​विशेष मुलांसोबत रमली 'लालबागची राणी'

​विशेष मुलांसोबत रमली 'लालबागची राणी'

ाजात गतिमंद समजल्या जाणाऱ्या या विशेष मुलांचे वेगळे जग असते. त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन हा सामान्यांपेक्षा वेगळा असतो. त्यांच्या या जगाची अनोखी सफर एका आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. तो चित्रपट म्हणजे प्रसिध्द दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा 'लालबागची राणी'. या विशेष मुलांचे आयुष्य जवळून अनुभवण्यासाठी व त्यांच्याशी भावनिक बंध जुळवण्यासाठी चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणारी वीणा जामकर हिने ठाणे येथील जागृती पालक या विशेष मुलांच्या संस्थेला भेट दिली. यावेळी तिने त्यांच्यासोबत मजा-मस्ती करत संवाद साधला. इतकेच नव्हे तर त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन व रंगीत फुगे दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आली. 
 
सर्वांचा लाडका अभिनेता प्रथमेश परब आणि पार्थ भालेराव यांनीही त्यांच्या हटके स्टाईलने डान्स करून मुलांमध्ये ते मिसळून गेले. लक्ष्मण उतेकर यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक वर्ष सिनेमॅटोग्राफर म्हणून कार्यरत आहेत. 'टपाल' चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर ते आता'लालबागची राणी' चित्रपट घेऊन येत आहेत. 

Web Title: Ramli 'Queen of Lalbagh' with special children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.