स्वयंउद्योकांना रामदेव बाबांचा कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 02:08 IST2016-02-21T09:08:12+5:302016-02-21T02:08:12+5:30

बाबा रामदेवनी स्वदेशी उत्पादनांवर भर देत नव स्वयंद्योजकांना वस्तूंच्या किंमती सामान्य माणसाला परवडतील अशा ठेवण्याचे आवाहन केले. 

Ramdev Baba's letter to self-seekers | स्वयंउद्योकांना रामदेव बाबांचा कानमंत्र

स्वयंउद्योकांना रामदेव बाबांचा कानमंत्र

ोग गुरू’ बाबा रामदेवच्या ‘पतंजली’ने बाजारपेठेत चांगलीच खळबळ उडविली आहे. अन्न व सौंदर्यप्रसाधने तयार करणाऱ्या पतंजलीचा व्यावसाय आता पाच हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे रामदेव बाबा आता बिझनेस गुरू म्हणूनही ओळखले जाऊ लागले. 

‘आॅन्ट्रोप्रनोर आर्गनायझेशन’ तर्फे आयोजित तरुण उद्योजकांच्या एका परिषदेत बोलताना त्यांनी स्वदेशी उत्पादनांवर भर देत नव स्वयंद्योजकांना वस्तूंच्या किंमती सामान्य माणसाला परवडतील अशा ठेवण्याचे आवाहन केले. 

सहाशेपेक्षा जास्त स्वयंद्योजकांना संबोधित करताना बाबा रामदेव म्हणाले की, ‘शंभर टक्के प्रामाणिकपणाने तुमचे काम करा. देशातील सामान्य माणूस तुमची वस्तू खरेदी करू शकेल इतकीच किंमत ठेवा. भारत सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आपली स्पर्धा आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी आहे. स्वदेशी वस्तूनिर्मितीमध्ये वाढ करून आपण व्यावसाय वृद्धी केली पाहिजे.’

Web Title: Ramdev Baba's letter to self-seekers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.