हॉलिवूड स्टार साकारणार ‘रामायण’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 11:19 IST2016-03-15T18:19:52+5:302016-03-15T11:19:52+5:30
हॉलिवूडमधील तीन तरुण कलावंत विनीत सिन्हा, शॉन ग्रॅहम आणि अमेरिकेतील क्रिएटिव्ह दिग्दर्शक रॉनी आॅलमन हे तीन्ही स्टार आता ‘रामायण’ कथेला भव्यदिव्य रुपात जगासमोर आणणार आहेत.

हॉलिवूड स्टार साकारणार ‘रामायण’
ही नवी कलाकृती निर्माण करण्यासाठी ते आधुनिक 3D तंत्रज्ञानाचा वापर करणार असून हा चित्रपट ‘लॉर्ड आॅफ द रिंग्ज’ किंवा इतर कोणताही हॉलिवूड सुपरहिरो चित्रपटाइतकाच दमदार असेल अशी माहिती या कलाकारांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे. बॅटमॅन, सुपरमॅन, पोके मॉन अशा कलाकृतींचे जगभरात चाहते आहेत. पण यात कोणताही भारतीय सुपरहिरो दिसत नाही. म्हणूूनच आम्ही जगाला आता ही कथा सांगणार असल्याचे विनीत म्हणाला.
बाहुबलीच्या बजेटपेक्षाही दुप्पट म्हणजे तब्बल ५०० कोटी रुपये असणार आहे. या चित्रपटातील कलाकार प्रामुख्याने भारतीय असणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग इंग्रजीत झाले तरी त्याचे विविध भारतीय भाषांमध्ये आणि अनेक जागतिक भाषांमध्ये डबिंग केले जाणार आहे.