भूतानच्या शाहीघराण्यात राजपुत्राचा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:51 IST2016-02-07T01:21:26+5:302016-02-07T06:51:26+5:30

 थिंपूमध्ये राजघराण्याच्या माध्यम कार्यालयाने या वृत्ताची अधिकृत घोषणा केली

Rajputra was born in Bhutan's royal house | भूतानच्या शाहीघराण्यात राजपुत्राचा जन्म

भूतानच्या शाहीघराण्यात राजपुत्राचा जन्म

तानच्या शाहीघराण्यात राजपुत्राचा जन्म

राजे जिग्मे खिसर नामग्याल वांगचूक आणि राणी जेत्सून पेमा यांच्या कुटुंबात शुक्रवारी राजपुत्राचा जन्म झाला आहे. थिंपूमध्ये राजघराण्याच्या माध्यम कार्यालयाने या वृत्ताची अधिकृत घोषणा केली. ३५ वर्षीय वांगचूक यांचे शिक्षण आॅक्स्फोर्डमध्ये झाले आहे. त्यांनी 2011 मध्ये बौद्ध पद्धतीनुसार 25 वर्षीय जेत्सून पेमा यांच्याशी विवाह केला होता. 
बाळ आणि मातेची प्रकृती उत्तम असल्याचे वृत्तात म्हटले आहे. बाळाच्या जन्माच्या वेळी वांगचूक हे राणीच्या बाजूला उपस्थित होते. मागील नोव्हेंबरमध्ये वांगचूक यांनी त्यानच्या पहिल्या बाळाचे आगमन होणार असल्याचे वृत्त दिले होते. विवाहापूर्वी वांगचूक यांनी आपल्या भावी पत्नीविषयी जाहीर माहिती दिली होती. माध्यमांत दोघांची हातात हात घेतलेली छायाचित्रेही प्रसिद्ध झाली होती. वांगचूक हे 2008 मध्ये त्यांचे वडील राजे जिग्मे सिंघये वांगचूक यांची वारसदार म्हणून निवड केली होती. त्यानंतर त्यांनी भूतानच्या लोकशाहीकडे प्रवासासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांनी देशात प्रथमच लोकशाही पद्धतीने निवडणुका घेतल्या होत्या. असे असले तरी देशावर अजूनही या राजघराण्याचा मोठा प्रभाव आहे. 1999 मध्ये या देशात इंटरनेट आणि दृरचित्रवाणी या सोयींचे आगमन झाले

Web Title: Rajputra was born in Bhutan's royal house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.