रजनीकांत करणार वोट अपिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 05:59 IST2016-03-01T12:59:06+5:302016-03-01T05:59:06+5:30
तामिळनाडूचा सुपरस्टार रजनीकांत याची लोकप्रीयता कॅश करण्यासाठी निवडणूक आयोगही सरसावला आहे.

रजनीकांत करणार वोट अपिल
त मिळनाडूचा सुपरस्टार रजनीकांत याची लोकप्रीयता कॅश करण्यासाठी निवडणूक आयोगही सरसावला आहे. रजनीची लोकप्रीयता लक्षात घेता, मतदारांना जागृत करण्यासाठी एका जाहिरातीत त्याला घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तामिळनाडूत यावर्षी मे महिन्यात निवडणूक होत आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी रजनीकांतला जाहिरातीचा प्रस्ताव दिला आहे. लवकर अभिनेत्री नयनतारा मतदारांना मतदान करा, असे आवाहन करताना दिसणार आहे. क्रिकेटर अश्विन यानेही निवडणूक आयोगासाठी कुठलेही मानधन न घेता जाहिरात केली आहे.