५५ कोटींचा 'राजेशाही' विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 06:03 IST2016-01-16T01:12:17+5:302016-02-08T06:03:02+5:30

भारतात आता राजे-महाराजे राहिले नाहीत मात्र राजेशाही थाट अजूनही गेलेला नाही. अनिवासी भारतीय डॉ. रवी ...

'Rajeshahi' wedding ceremony of 55 crores | ५५ कोटींचा 'राजेशाही' विवाह सोहळा

५५ कोटींचा 'राजेशाही' विवाह सोहळा

रतात आता राजे-महाराजे राहिले नाहीत मात्र राजेशाही थाट अजूनही गेलेला नाही. अनिवासी भारतीय डॉ. रवी पिल्लई यांची मुलगी डॉ. आरती आणि कोचीचा राहणारा डॉ. आदित्य विष्णू यांचा विवाह सोहळा संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला. याचे कारण होते लग्नाला हजर असलेले पाहुणे आणि त्यासाठी आलेला खर्च!

सुमारे ५५ कोटी रुपयांच्या या लग्नाला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी, त्यांचे कॅबिनेट मंत्री, बहरिन, कुवैत, सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील सदस्य, ४२ आंतरराष्ट्रीय नेते व सीईओ वधू-वराला आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.

कोल्लम येथील आश्रम मैदानावर उभारण्यात आलेल्या पाच एकर मंडपात हा राजेशाही विवाह सोहळा पार पडला. मंडप आणि महलाची प्रतिकृती बनविण्यासाठी 'बाहुबली' चित्रपटातील सेट तयार करणार्‍या टीमच्या मार्गदर्शनाखाली दोन हजारपेक्षा जास्त लोक ४५ दिवस काम करत होते. एकूण ५0 हजार लोक या लग्नाला ओल होते.

Web Title: 'Rajeshahi' wedding ceremony of 55 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.