फिजिक्सच्या तोंडी परीक्षेत ‘टी-20 विश्वकप’चे प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:43 IST2016-02-07T07:13:43+5:302016-02-07T12:43:43+5:30
दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेचा हंगाम सुरू होतो. मुळे परीक्षे आधी शाळा-कॉलेजात प्रात्यक्षिके आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात.
फिजिक्सच्या तोंडी परीक्षेत ‘टी-20 विश्वकप’चे प्रश्न

फेब्रुवारी महिन्यापासून दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेचा हंगाम सुरू होतो. मुळे परीक्षे आधी शाळा-कॉलेजात प्रात्यक्षिके आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात. आतापर्यंत शिकलेल्या सिलॅबसवर प्रश्न त्यामध्ये विचारले जातात. मात्र, दिल्लीच्या संस्कृती स्कूलमधील बारावीचे विद्यार्थ्यांना एका वेगळ्याच अनुभवाला सामोरे जावे लागले. सीबीएसई बोर्डाने नेमूूून दिलेल्या बाह्य परीक्षकाने मुलांना फिजिक्सच्या तोंडी परीक्षेत गाणे गायला आणि नाचायला सांगितले. आता बोला!
हा सगळा प्रकार तेव्हा समोर आला तेव्हा काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्राचार्या आभा सहगल यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी संबंधीत सीबीएसई अधिकाºयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यावर कार्यवाही करत त्या शिक्षकाला परत बोलावून घेतले. फिजिक्सबद्दल प्रश्न विचारायचे सोडून हा शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील महिन्यात होणाºया टी-20 वर्ल्डकप विषयी प्रश्न विचारत होता. याबद्दल तक्रार येताच आम्ही तातडीने कार्यवाही केली, अशी माहिती सीबीएसई बोर्डाच्या वरिष्ट अधिकाºयाने सांगितले.
मुलांना डान्स आणि गाणे लावले याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला. नाराज पालकांनी शाळेच्या प्रशासनाकडे कडक पाऊले उचलण्याची आग्रही मागणी केली. शाळेनेसुद्धा याकडे जातीने लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी फार महत्त्वाचे असते. त्यांच्या भविष्याशी अशा प्रकारे खेळ केला जावा ही बाब नक्कीच निंदणीय आहे, अशी तक्रार पालाकांनी केली.